Siddhi Hande
आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. घरोघरी बाप्पाचे आगमन झाले आहे.
बाप्पासाठी रोज नैवेद्यासाठी काय बनवायचं असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.तुम्ही बाप्पासाठी मोतीचूरचे लाडू बनवू शकतात.
मोतीचूरचे लाडू बनवण्यासाठी मोठ्या भांड्यात बेसन घ्या. त्यात केशरी रंग टाकून तो मिसळून घ्या.
या बेसनात बेकिंग सोडा टाका. या बेसनाच्या गुठल्या होणार नाही याची काळजी घ्या.
एका मोठ्या कढईत तेल गरम करा. त्यानंतर लाडू करण्यासाठी कढईवर चाळण ठेवा. त्यात हळूहळू बुंदी पाडून घ्या.
यानंतर एक पॅन घ्या त्यात पाणी आणि साखर टाका. चांगला पाक होऊ द्या.
यानंतर या पाकात बुंदी टाका. बुंदी पूर्णपणे मिक्स होत नाही तोपर्यंत शिजवून घ्या.
यानंतर हातावर तूप लावून लाडू बनवायला सुरुवात करा. या लाडूवर सुकामेवा टाका.