Ganesh Utsav 2022 : रस्त्यांवर खड्डे खाेदल्यास गुन्हा दाखल करु; गणेशाेत्सव मंडळांना प्रशासनाचा इशारा

गणेशाेत्सव उत्साहात साजरा करा परंतु ताे करताना इतरांना त्रास हाेणार नाही याची काळजी घ्या असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
potholes, hingoli, ganesh mandal
potholes, hingoli, ganesh mandalsaam tv
Published On

Ganesh Utsav 2022 : गणेशाेत्सव मंडळांनी नियमांचे पालन करावे. आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत गालबाेट लागू नये असे वर्तन मंडळांनी करु नये. गणेशाेत्सव (Ganesh Festival) साजरा करण्यासाठी मंडप घालताना रस्त्यावर खड्डे खाेदू नयेत अन्यथा गुन्हा दाखल करु असा इशारा हिंगाेली प्रशासनानं मंडळांना दिला आहे.

आगामी काळात येऊ घातलेल्या गणेश उत्सवावर हिंगोली जिल्हा प्रशासनाने अनेक निर्बंध घातले आहेत. गणरायाची स्थापना व विसर्जन करताना डिजे लावण्यास पोलीस प्रशासनाने सक्त मनाई केली आहे. मिरवणुकीत गुलालाची उधळण देखील करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

potholes, hingoli, ganesh mandal
Afzal Khan Dekhava Controversy : 'निश्चिंत रहा, अफजल खान वृत्तीचं सरकार गेलंय'

आज हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह शांतता समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रशासनाने गणेशाेत्सव साजरा करताना नियमांचे पालन केले जाईल याची दक्षता असं आवाहन केले. दरम्यान शहरात गणेशाची स्थापना करताना उभारण्यात येणाऱ्या स्टेजसाठी शासकीय रस्त्यावर खड्डे (potholes) खोदल्यास थेट गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा देखील प्रशासनाने दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

potholes, hingoli, ganesh mandal
Ganesh Utsav 2022 : गणेशाेत्सव मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षासह साऊंड सिस्टिम मालकावर सातारा पाेलिसांनी केली कारवाई
potholes, hingoli, ganesh mandal
अफजल खानाचा वध शिवरायांनी केला हा इतिहास पुसला जाणार नाही : अरबाज शेख

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com