अफजल खानाचा वध शिवरायांनी केला हा इतिहास पुसला जाणार नाही : अरबाज शेख

गणेशाेत्सव काळात सामाजिक तेढ निर्माण हाेऊ नये याची काळजी मंडळांनी घ्यावी असं आवाहन पाेलीस दलानं केले.
satara, afzal khan vadh, afzal khan, ganesh festival 2022, ajaykumar bansal, ganeshotsav mandal
satara, afzal khan vadh, afzal khan, ganesh festival 2022, ajaykumar bansal, ganeshotsav mandalsaam tv
Published On

Afzal Khan Vadh Decoration : कायदा व सुव्यवस्था निर्माण हाेईल अशा प्रकारच्या देखाव्यांना परवानगी दिली जाणार नाही असे सातारा पाेलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळांच्या बैठकीत स्पष्ट केले. यामुळे सातारा जिल्ह्यातील गणेशाेत्सव मंडळांना (ganesh festival) देखावा करण्यापुर्वी पाेलिस दलाची (satara police) परवानगी घ्यावी लागणार असं चित्र निर्माण झाले आहे.

सातारा येथील पाेलीस करमणुक केंद्रच्या अलंकार सभागृहात साेमवारी सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळांची तसेच शांतता समितीची बैठक बाेलावली हाेती. या बैठकीस विविध गणेशाेत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध राजकीय, सामाजिक तसेच हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित हाेते.

satara, afzal khan vadh, afzal khan, ganesh festival 2022, ajaykumar bansal, ganeshotsav mandal
Udayanraje Bhosale : डॉल्बीवरुन उदयनराजे भडकले, म्हणाले...

या बैठकीत गणेशाेत्सव मंडळांनी डाॅल्बी लावण्यास परवानगी मिळावी, अफजल खान वध देखावा सादर करण्यास परवानगी मिळावी, राष्ट्रध्वज लावण्यास परवानगी मिळावी यासह मिरवणुक मार्गावरील खड्डे बुजवावेत, विद्युत यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे व्यवस्थित रित्या सुरु राहावेत अशा मागण्या केल्या.

satara, afzal khan vadh, afzal khan, ganesh festival 2022, ajaykumar bansal, ganeshotsav mandal
England Tour : धोनीच्या 'त्या' षटकारनं माझं आयुष्यच बदललं, इंडियाचं स्वप्न पुर्ण करणार : किरण नवगिरे

या बैठकीत सर्वांची मतं जाणून घेतल्यानंतर पाेलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानूसार मंडळांनी ध्वनीक्षेपकचा वापर करावा असे स्पष्ट केले. ते म्हणाले जे ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करतील त्यांच्यावर नाईलाजास्तव कारवाई हाेईल. गणेशाेत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी विशेषत: युवकांनी त्यांच्या कारवाई (गुन्हा) हाेऊ नये याची काळजी घेतली पाहिजे जेणेकरुन भविष्यात त्यांच्या करिअरला अडचण येणार नाही असेही बन्सल यांनी नमूद केले.

satara, afzal khan vadh, afzal khan, ganesh festival 2022, ajaykumar bansal, ganeshotsav mandal
Satara : साता-यात खळबळ; लिंबु डोक्यावर फिरवुन जादुटोणा करत युवतीवर अत्याचार

या बैठकीत हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तसेच विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी अफजल खान वध (Afzal Khan Vadh) हा देखावा सादर करण्यासाठी मंडळांना परवानगी मिळावी अशी मागणी करण्यात आली हाेती. त्यावर बाेलताना बन्सल यांनी सामाजिक तेढ निर्माण हाेतील अशा देखाव्यांना परवानगी देता येणार नाही. देखावे स्क्रूटिनी करुन पाेलीस दल देखाव्यांना परवानगी देईल असे स्पष्ट केले.

satara, afzal khan vadh, afzal khan, ganesh festival 2022, ajaykumar bansal, ganeshotsav mandal
अफजल खान वध देखाव्याच्या परवानगीवर ठाकरे गटातील नेते म्हणाले, पुण्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात...

त्यापुर्वी बैठकीत उपस्थित असलेल्या हिंदु-मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खान याचा वध केला. त्यांचे शाैर्य पाठ्यपुस्तकातून विद्यार्थ्यांपर्यंत पाेहचते. नेमकं काेणाचा खानावर प्रेम उफाळून आलं आहे असाही सूर आवळला गेला. आरबाज शेख याने अफजल खानास उभा फाडला हा इतिहास नेमका कुणाला खूपताेय ? अशी विचारणाच प्रशासनास बैठकीत केली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com