England Tour : धोनीच्या 'त्या' षटकारनं माझं आयुष्यच बदललं, इंडियाचं स्वप्न पुर्ण करणार : किरण नवगिरे

मला देशास विश्वकरंडक जिंकून द्यायचा आहे असं किरण नवगिरेनं नमूद केले.
Kiran Navgire, Maharashtra, India , Indian Cricket Women Team, T-20, Malshiras, kiran navgire selected in indian women cricket team.
Kiran Navgire, Maharashtra, India , Indian Cricket Women Team, T-20, Malshiras, kiran navgire selected in indian women cricket team. Saam Tv
Published On

Kiran Navgire Latest Marathi News : देशाच्या क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्रातील खेळाडू कायम आपला ठसा उमटवत असतात. त्यातील अनेक खेळाडूंनी प्रतिकुल परिस्थितीतून वाटचाल केल्याची उदाहरणं आपल्या समाेर आहेत. हे खेळाडू आपल्या गावाचं, राज्याचे तसेच देशाचे नाव उज्जवल करण्यासाठी एका विशिष्ट ध्येयाने झपाटल्याचे आपण पाहिलं आहे. यापैकीच एक किरण नवगिरे म्हणावी लागेल.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मिरे गावातील किरण नवगिरे हिची भारतीय क्रिकेट संघात निवड झालेली आहे. आगामी काळात टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी ती इंग्लंड दौऱ्यावर जाईल. किरण हि लेडी धाेनी म्हणून सुपरिचित आहे. तिच्या तुफान फटकेबाजीसाठी ती सध्या चर्चेतील क्रिकेटपटू आहे. (kiran navgire selected in indian woment cricket team)

किरणला महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळता आलं नाही म्हणून तिने थेट नागालँड गाठलं. भाला फेक, शॉटपुट या खेळात उत्तम कामगिरी केल्यानंतर तिने क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करण्यास प्रारंभ केला.

इंग्लंड दौऱ्याबाबत (England Tour) किरण म्हणाली देशासाठी खेळणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. माझे ही हाेते. माझी भारतीय संघात निवड झाल्याने मी खूप आनंदित आहे. ख-या अर्थाने माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे. इंग्लंडला मोठी खेळी करायचे स्वप्न किरणने बाळगल्याचे तिच्या देहबाेलीतून स्पष्ट हाेत हाेते.

Kiran Navgire, Maharashtra, India , Indian Cricket Women Team, T-20, Malshiras, kiran navgire selected in indian women cricket team.
Nitin Gadkari : अटल बिहारी वाजपेयींचं 'ते' वाक्य आज खरं ठरलं : नितीन गडकरी (व्हिडिओ पाहा)

महिला टी २० स्पर्धेत मी नागालँडच्या संघाकडून खेळताना अरुणाचल प्रदेशविरुद्ध खूप माेठी धावसंख्या उभारीन असं वाटलं नव्हतं. किरणने या सामन्यात ७६ चेंडूत १६२ धावा ठाेकल्या हाेत्या. टी २० क्रिकेट स्पर्धेत दीडशे धावा करणारी किरण जगातील पहिली खेळाडू ठरणारी किरण म्हणाली माझ्यासाठी इंग्लंड दौरा महत्त्वाचा आहे. मला देशास विश्वकरंडक जिंकून द्यायचा आहे. त्यासाठी मी कष्ट घेतच आहे पण उराशी बाळगलेले स्वप्न पुर्ण हाेई पर्यंत मी प्रयत्न करीत राहीन असं नमूद केले.

Kiran Navgire, Maharashtra, India , Indian Cricket Women Team, T-20, Malshiras, kiran navgire selected in indian women cricket team.
Shivsainik : आमच ठरलं ! शंभूराज देसाईंना पुन्हा विधानसभेत पाठविणार नाही

शेतकरी कुटुंबात जन्मलेली किरण मिरे (malshiras) गावी मुलांसोबत क्रिकेट खेळत असतं. त्यावेळी ग्रामस्थांचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असायचा. त्याविषयी किरणला छेडले असता ती म्हणाली मुलीनं मुलांबरोबर खेळणं हे सहसा लाेकांना आवडत नाही. त्यामुळे काही लोकं मला ओरडायचे. त्यामुळं मी शेतात जाऊन सराव करायचे. आमची दाेन एकर शेती आहे. मी माझ्या दाेन भावांसाेबत कधी कधी शेतात ट्रॅक्टर चालवते असेही किरणनं नमूद केले.

Kiran Navgire, Maharashtra, India , Indian Cricket Women Team, T-20, Malshiras, kiran navgire selected in indian women cricket team.
Kiran Navgire : इंग्लंड दाै-यासाठी लेडी धाेनीचा भारतीय संघात समावेश; महाराष्ट्रात चैतन्य

खरंतर पुर्वी मी मैदानी स्पर्धेत विशेषत: भाला फेक क्रीडा प्रकारात काैशल्य सिद्ध करीत हाेते. सन २०११ मध्ये टीम इंडियातील महेंद्रसिंग धोनी याने मारलेला षटकार मला भावून गेला. त्यानंतर मी देखील असाच षटकार मारायचं ठरवलं आणि तिथून माझं क्रिकेटवरील (Cricket) प्रेम वाढल्याचे किरणनं नमूद केले. ती म्हणाली धोनीला माझे आदर्श असून सन २०११ च्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर मी त्यांचे फाॅलाेअर झाले. स्टेडियमच्या बाहेर चेंडू टाेलावयाचा आणि धाेनीला (mahendra singh dhoni) प्रत्यक्ष भेटणे ही स्वप्न देखील किरण नवगिरेनं पाहिली आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Kiran Navgire, Maharashtra, India , Indian Cricket Women Team, T-20, Malshiras, kiran navgire selected in indian women cricket team.
Satara : साता-यात खळबळ; लिंबु डोक्यावर फिरवुन जादुटोणा करत युवतीवर अत्याचार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com