- सिद्धेश म्हात्रे
Navi Mumbai : महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना पुढील निवडणुकीत (Election) चितपट करण्यासाठी नवी मुंबईतून शिवसैनिकांनी रणशिंग फुंकलं. शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुका विधानसभा मतदार संघातील नवी मुंबई स्थित राहिवाश्यांचा मेळावा कोपरखैरणेत संपन्न झाला. (Navi Mumbai Shivsena Latest Marathi News)
शिवसेना उपनेते नितीन भानुगडे पाटील यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला. शिवसेनेशी (Shivsena) गद्दारी करणाऱ्या 40 पैकी 39 आमदारांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बघून घेतील मात्र शंभूराज देसाई यांना मात्र पाटण तालुक्यातील शिवसैनिक पुन्हा विधानसभेत जाऊ देणार नाही असा निर्धार यावेळी पाटण तालुक्यातील शिवसैनिकांनी मेळाव्यात केला.
या मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला. बंडखोरी झाली असली तरी शिवसैनिक मात्र शिवसेने सोबतच असल्याची प्रतिक्रिया शिवसेना उपनेते नितीन भानुगडे पाटील यांनी व्यक्त केली. ते म्हणाले गद्दारांना शिवसैनिकच आता त्यांची जागा दाखवतील.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.