Nitin Gadkari : अटल बिहारी वाजपेयींचं 'ते' वाक्य आज खरं ठरलं : नितीन गडकरी (व्हिडिओ पाहा)

मंत्री गडकरी यांनी नागपूरात मार्गदर्शन करताना सामाजिक कार्यास हातभार लावावा असं आवाहन केलं.
Nitin Gadkari, atal bihari vajpayee, nagpur
Nitin Gadkari, atal bihari vajpayee, nagpurSaam Tv
Published On

Nitin Gadkari : अटल जी, अडवाणी या नेत्यांनी तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी झटून काम केले. अहाेरात्र भरपूर काम केले म्हणून आज मोदींच्या नेतृत्वात देशात आणि अनेक राज्यात भाजपची सत्ता आली आहे असे मत नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केले. नागपूर येथे (कै.) लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या वतीने आयोजिलेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बाेलत हाेते.

नागपूरातील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात शिक्षक आणि पर्यवेक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात गडकरी बोलत होते. (कै.) लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेने त्यांच्या एकलव्य एकल विद्यालयातील शिक्षक आणि पर्यवेक्षकांसाठी हे चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले होते.

Nitin Gadkari, atal bihari vajpayee, nagpur
Nitin Gadkari : तुम्ही सांगाल तसं सरकार चालणार नाही : नितीन गडकरी (व्हिडिओ पाहा)

गडकरी म्हणाले जेव्हा मी पहिल्यांदा मुंबईतील भाजप कार्यालयात गेलो होतो तेव्हा कार्यालयाची दयनीय अवस्था होती. तेव्हा मावळत्या सूर्याला पाहून अटल बिहारी वाजपेयी यांनी "अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा" असे वक्तव्य केले होते आणि आज त्यांचे वक्तव्य खरे ठरले.

याचे प्रमुख कारण म्हणजे जनतेने आम्हांला दिलेली साथ. जसे कार्य आपण राजकीय क्षेत्रात केले आहे. तसेच कार्य सामाजिक क्षेत्रातही करण्याची गरज आहे. संघ प्रणित एकलव्य एकल विद्यालयातील शिक्षक या नात्याने तुम्ही सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य कराल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केले.

Edited By : Siddharth Latkar

Nitin Gadkari, atal bihari vajpayee, nagpur
Shivsainik : आमच ठरलं ! शंभूराज देसाईंना पुन्हा विधानसभेत पाठविणार नाही
Nitin Gadkari, atal bihari vajpayee, nagpur
Accident News : नवीन कसारा घाटात अपघात; एक ठार, एक जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com