Nitin Gadkari : तुम्ही सांगाल तसं सरकार चालणार नाही : नितीन गडकरी (व्हिडिओ पाहा)

माझ्या आयुष्यात रस्ते, पुल, बाेगदा, गंगा मार्ग हे काही अचिव्हेमेंट नाही असेही गडकरीनी नमूद केलं.
Nitin Gadkari
Nitin GadkariSaam Tv
Published On

नागपूर : चीनमधून अगरबत्तीच्या काड्या आयात केल्या जायच्या मी त्यात लक्ष घालून आयात बंद केली. त्यामुळे चीनमध्ये माझा पुतळा जाळलं. गडचिरोलीत वन संपत्तीचा उपयोग करून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिलं पाहिजे असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नमूद केलं. गरिबांचे कल्याण करण्यासाठी कायदा ताेडवा लागला तर ताे ताेडावा असं महात्मा गांधी म्हणायचे. चांगल्या कामासाठी मी दहा वेळा कायदा ताेडला आहे. मी नेहमी अधिकाऱ्यांना सांगतो मी जस सांगेन तसं काम करायचं तुम्ही सांगाल तसं सरकार चालणार नाही असेही गडकरींनी एक किस्सा सांगताना नमूद केले. (Nitin Gadkari Latest Marathi News)

महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सच्या नागपूर शाखेकडून मल्टी डिस्प्लेनरी मल्टी मॉडेल रिझल्टच्या अंतर्गत आदिवासी यांच्या आरोग्य करता ब्लॉसम नावाच्या प्रकल्पाचे उद्घाटन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मंत्री गडकरी बाेलत हाेते.

Nitin Gadkari
BJP : 'आज 'दिवाळी' साजरी करतोय, मनसेला मंत्रिपद मिळाल्यास 'दसरा' साजरा करू'

मंत्री गडकरी म्हणाले सरकारी दवाखान्यात डॉक्टर असेल तर कंपाऊंडर नाही. ते असेल तर तिथे मरायला कोण जाईल अशी स्थिती आहे. डॉक्टरांना बॅक पॅक, व्हेंटिलेटर चालवता येत नाही ही स्थिती आहे तर पेशंटची काय स्थिती असेल सगळ्यांनी इन्शुरन्स काढला तर चांगलं.

Nitin Gadkari
Maharashtra Rain : मुंबईसह राज्याला पावसानं झाेडपलं, वाचा कूठं काय घडलं

आम्हांला सहावा वेतन आयोग द्या हे ओरडतात पण कामाचा मूल्यमापन व्हायला पाहिजे. मी काही अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही घरी बसा तुम्हाला पूर्ण पगार देऊ. तुम्ही येण्याने प्रॉब्लेम आहे. तुम्ही घरीच बसा. अधिकारी काम करत नसेल तर मला लिस्ट द्या मी पुढील काय ते बघून घेईल असेही गडकरींनी नमूद केले.

ते म्हणाले आदिवासी बांधवांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी सगळ्यांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. मी हुशार नाही किंवा त्या लायकीचा नाही. तरी मला दोन डिलिट विद्यापीठाने दिल्या. पण मी डॉक्टर लावत नाही. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात चांगलं काम म्हणाजे मी सायकल रिक्षा ओढणाऱ्या दाेन काेटी नागरिकांना ई- रिक्षा दिला. यासाठी मी कोर्टात देखील भांडलो. माझ्या आयुष्यात रस्ते, पुल, बाेगदा, गंगा मार्ग हे काही अचिव्हेमेंट नाही असेही गडकरीनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Nitin Gadkari
Maharashtra Rain : महाराष्ट्राचा तेलंगणाशी संपर्क तुटला; भंडा-यात रेड अलर्ट, उद्या शाळांना सुटी
Nitin Gadkari
BJP : 'आज 'दिवाळी' साजरी करतोय, मनसेला मंत्रिपद मिळाल्यास 'दसरा' साजरा करू'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com