देशभरात कोरोना पुन्हा एकदा पसरू लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी म्हणडे ३१ मे रोजी भारतात कोरोनाचे एक्टिव्ह रूग्ण ३३९५ असल्याची माहिती आबे. देशात सर्वात जास्त कोविडचे रूग्ण हे केरळमध्ये असल्याची माहिती आहे. यामध्ये 1336 केरळमध्ये रूग्ण असल्याचं समोर आलं आहे. यानंतर महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक रूग्ण असल्याची माहिती आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात देशात ४ कोरोनाच्या रूग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये दिल्ली, केरळ, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील एक-एक रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात ४६७, दिल्लीमध्ये ३७५, गुजरातमध्ये २६५, कर्नाटकमध्ये २३४, पश्चिम बंगालमध्ये २०५, तामिळनाडूमध्ये १८५ आणि उत्तर प्रदेशमध्ये ११७ कोरोनाच्या रूग्णांची संख्या समोर आली आहे.
२२ मे रोजी देशात कोविनाचे एकूण २५७ एक्टिव्ह रुग्ण होते. २६ मे पर्यंत हा आकडा वाढून तब्बल १,०१० वर पोहोचला आणि शनिवारी ३,३९५ वर पोहोचला. या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ६८५ नवीन रुग्ण आढळल्याची माहिती आहे. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.
कोविड-१९ प्रकरणंवर लक्ष ठेऊन असलेल्या वर्ल्डोमीटर इंडेक्सनुसार, देशात शेवटची ३००० एक्टिव्ह प्रकरणं ही १ एप्रिल २०२३ रोजी पाहायला मिळाली होती. तेव्हा एकूण कोरोना प्रकरणांची संख्या ३०८४ होती.
केरळमध्ये कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी २०२५ मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद आहे. जिथे एकूण ७ जणांना आपला जीव गमवावा लागला. सर्व राज्यांमध्ये एकूण २२ मृत्यू झाले आहेत. कर्नाटकातील कोरोनाची परिस्थिती आणि शाळा पुन्हा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने एक परिपत्रक जारी केलंय. यामध्ये पालकांना ताप, खोकला, सर्दी आणि इतर लक्षणं आढळल्यास मुलांना शाळेत पाठवू नये, असं आवाहन करण्यात आलंय.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली २६ मे रोजी झालेल्या कोरोनाच्या परिस्थितीवरील आढावा बैठकीत काही निर्देश देण्यात आले. यामध्ये मुलांना पूर्णपणे बरं झाल्यानंतरच शाळेत पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.