Copper Water Safety Tips: तुमच्या या ३ चुकांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी बनतंय विषारी; वेळीच लक्ष द्या

Drinking Copper Water Side Effects: आरोग्याला फायदा व्हावा म्हणून अनेकजण तांब्याच्या भांड्यामधून पाणी पितात. मात्र यावेळी तुमच्याकडून नकळत काही चुका होऊ शकतात. या चुका कोणत्या आहेत ते पाहूयात.
Copper Water Safety Tips
Copper Water Safety Tipssaam tv
Published On

आपल्या शरीराला फीट ठेवण्यासाठी आपल्याला प्रत्येक पोषक तत्त्वांची गरज असते. कॉपर म्हणजे तांबं यापैकीच एक आहे. तांबं हे आपल्या शरीरासाठी अनेक कारणांसाठी महत्त्वाचं आहे, कारण ते हाडं मजबूत करतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं, हिमोग्लोबिन तयार करतं. या गोष्टी आपल्या निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाच्या असतात.

लोक शरीरातील तांब्यांची कमतरता वेगवेगळ्या प्रकारे भरून काढतात. यासाठी काही लोक तांबेयुक्त पदार्थ वापरून पाहतात. तर काही लोक तांब्याच्या भांड्यांमध्ये पाणी पितात. आजकाल बरेच लोक तांब्याच्या भांड्यात पाणी पितात. असं केल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात. तांब्याच्या भांड्यात पाणी पिताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. हे पाणी विषारी बनू शकतं आणि तुमच्या आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. यावेळी ३ गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

Copper Water Safety Tips
Cerebral edema: मेंदूच्या नसा फुगल्यावर शरीर देतं खास संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा जीव गमवाल

तांब्याच्या भांड्याची सफाई न करणं

जर तुम्ही पिण्याच्या पाण्यासाठी कोणतंही तांब्याचं भांडे वापरत असाल तर त्याच्या स्वच्छतेची काळजी घ्या. प्रत्येक वापरानंतर भांडी पाण्याने पूर्णपणे धुवा. याशिवाय दर 30 मिनिटांनी मीठाने भांडी स्वच्छ करा. जेणेकरून ऑक्सिडेशनमुळे झालेले डाग साफ करता येऊ शकतात.

दिवसभर पाणी पिणं

काही लोक फायदे मिळवण्यासाठी दिवसभर तांब्याच्या भांड्यातील पाणी पित राहतात. दरम्यान असं केल्याने आरोग्यालाही हानी पोहोचू शकते. दिवसभर तांब्याचे पाणी प्यायल्याने कॉपर टॉक्सिसिटीचा धोका वाढतो. यामुळे मळमळ, चक्कर येणं, पोटदुखी आणि गंभीर प्रकरणांमध्ये किडनी निकामी होऊ शकते .

Copper Water Safety Tips
Leg Vein Blockage: पायाच्या ब्लॉक नसा उघडण्यासाठी सोपे ४ उपाय; वेदनेपासूनही मिळेल त्वरित आराम

लिंबू आणि मीठाचा वापर करू नका

बरेच लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात लिंबू आणि मधाच्या पाण्याने करतात. रिकाम्या पोटी हे पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. परंतु कधीही तांब्याच्या ग्लासात, बाटलीतून पिऊ नका. लिंबूमध्ये असलेलं आम्ल तांब्यासोबत प्रक्रिया करतं. ज्यामुळे पोटदुखी, गॅस आणि उलट्या होऊ शकतात.

Copper Water Safety Tips
Brain tumor: निरोगी व्यक्तींमध्येही दिसतात ब्रेन ट्यूमरची ४ लक्षणं; दुर्लक्ष करण्याची चूक करू नका

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com