Diet foods that can affect long-term health Freepik
लाईफस्टाईल

Dangerous Diet Foods : डायटिंग करताय ? हे ३ पदार्थ तुमच्या जीवावर बेतू शकतात.

Avoid These 3 Diet Items : आजकाल अनेक लोक डायटिंग करतात. डॉक्टरांच्या मते मका, सोया, फळे आणि लो कॅलरी शुगरचे डायट पदार्थ तुमच्या जीवावर बेतू शकतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजकाल सर्वचजण त्यांच्या आरोग्याबद्दल अधिक सजक झाले आहेत. शरीर फिट आणि निरोगी कसे ठेवता येईल याचाच विचार करत असतात. यासाठी ते अनेक प्रकारचे डायट करतात. ज्यामध्ये फळं, हिरव्या भाज्या, कमी कॅलरीज असणारे पदार्थ यांचा समावेश होतो. पण आरोग्याची निगा राखण्यासाठी तुम्ही खात असलेले हे पदार्थ तुमच्या जीवावरही बेतू शकतात. याबद्दल बोलताना अमेरिकन डॉक्टर मार्क हाइमिन यांनी अशा ३ पदार्थांबद्दल सांगितले आहे. हे पदार्थ कोणते ते पुढे जाणून घेऊया.

शून्य कॅलरी असलेले कृत्रिम गोड पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात. या पदार्थांमध्ये असलेले अति गोड रसायने आतड्यांच्या मायक्रोबायममध्ये अडथळा आणतात. यामुळे शरीरात इन्सुलिन स्पाइक्स वाढतात आणि अजुन खाण्याची इच्छा होते. सतत भूक लागल्याने आपण सारखे काहीतरी खात राहतो. अशाने अतिरिक्त चरबी वाढते. आर्टिफिशियल स्वीटनर असलेले हे गोड पदार्थ वाढते वजन आणि मधुमेहाला आमंत्रण देतात.

अनेक लोकांच्या डायटमध्ये सोया चंक्स आणि मक्याचा समावेश असतो. सोया आणि मका हे बहुतेकदा जीएमओ पद्धतीने बनवलेली असतात. म्हणजेच त्यात आनुवांशिक बदल केले जातात. या जीएमओ पिकांचा वापर कॉर्नस्टार्च, कॉर्न सिरप, कॉर्न ऑइल, सोयाबीन ऑइल किंवा दाणेदार साकर बनवण्यासाठी केला जातो. जर तुम्ही जीएमओ सोया किंवा मका खात असाल, तर त्यात वापरले जाणारे ग्लायफोसेट हे रसायन तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते.

जास्त साखरेचे सेवन टाळण्यासाठी तसेच शरीराला जीवनसत्त्वे मिळण्यासाठी फळे खाणे योग्य मानले जाते. पण काही फळे अशी आहेत ज्यांवर वर्षानुवर्षे सर्वाधिक कीटकनाशके वापरली जातात. ही रसायने हार्मोन असंतुलन, मानसिक विकासातील समस्या आणि कर्करोगाशी संबंधित आजारांना कारणीभूत ठरतात. यांना द डर्टी डझन फळे असे म्हणतात. अशा प्रकारची फळे न खाता सेंद्रिय खतात वाढवलेली फळेच खा.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: थोड्याच वेळात कर्जत- बदलापूर लोकल वाहतूक सुरू होणार

Manikrao Kokate : रोहित पवारांनी आणखी एक पत्ता काढला, कृषीमंत्र्यांवर केला गंभीर आरोप

Igatpuri Tourism : पावसाच्या सरी अन् धुक्याची चादर, इगतपुरीजवळ वसलाय निसर्गाचा अद्भुत नजारा

Ladki Bahin Yojana : लाडकीमुळे महाराष्ट्रातील ४ योजना बंद; लाभार्थी शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांना बसणार फटका?

Harshada Khanvilkar : "बाप्पाचं नाव शाहरुख ठेवलंय..."; हर्षदा खानविलकरनं सांगितले खास कनेक्शन

SCROLL FOR NEXT