Early signs of kidney stones saam tv
लाईफस्टाईल

Kidney stone pain: सतत जाणवणारी कंबरदुखी असू शकते किडनी स्टोनचं लक्षणं; कसे केले जातात यावर उपचार?

Symptoms of kidney stones: आपल्यापैकी अनेक लोकांना कधी ना कधी पाठीच्या दुखण्याचा (Back Pain) अनुभव येतो. पण जर ही वेदना सतत आणि असह्य असेल, तर ती केवळ सामान्य स्नायूंच्या दुखण्यामुळे नाही, तर किडनी स्टोन म्हणजेच मूत्रपिंडातील खड्यांमुळेही असू शकते.

Surabhi Jayashree Jagdish

कॅल्शियम, युरिक ऍसिड आणि इतर खनिजांच्या अतिरेकामुळे किडनी स्टोन तयार होतात. ही समस्या स्त्री आणि पुरुष दोघांनाही होऊ शकते. वेळीच उपचार न केल्यास ते गंभीर गुंतागुंत निर्माण करू शकतात. या आर्टिकलच्या माध्यमातून किडनी स्टोनची कारणं, लक्षणं आणि गुंतागुंत समजून घेण्यास मदत करतात.

झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे मूत्रविकार तज्ज्ञ डॉ. अनिल ब्राडू म्हणाले, ज्यावेळी लघवीमध्ये कॅल्शियम, ऑक्झॅलेट किंवा युरिक ॲसिडचं प्रमाण वाढतं, तेव्हा ते स्फटिकयुक्त कणांच्या रूपात किडनीत जमा होतात. लहान खडे दुर्लक्षित होऊ शकतात, परंतु मोठ्या खड्यांवर वेळेवर उपचार न केल्यास वेदना आणि गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. किडनी स्टोनचं व्यवस्थापन करण्यासाठी आणि या वेदनांपासून मुक्त होण्यासाठी वेळीच उपचार करणे महत्त्वाचे आहे.

कारणं

  • निर्जलीकरण किंवा पाणी कमी पिणे

  • मीठ, साखर किंवा प्रथिनांचे अतिप्रमाणातील सेवन

  • लठ्ठपणा

  • मूत्रपिंडातील खड्यांचा कौटुंबिक इतिहास

  • मूत्रमार्गात संसर्ग किंवा सांध्यांचे विकार यासारख्या वैद्यकीय परिस्थिती मूत्रपिंडातील खड्यांचे कारण ठरु शकतात.

लक्षणं काय आहेत

  • ओटीपोटाच्या खालच्या भागात किंवा कंबरेत वेदना

  • लघवी करताना वेदना

  • गुलाबी, लाल किंवा फेस येणारी लघवी

  • वारंवार लघवी करण्याची इच्छा

  • मळमळ किंवा उलट्या

  • या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि त्वरित निदान आणि व्यवस्थापनासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कशी होते गुंतागुंत?

अनेक किडनी स्टोनवर उपचार करता येतात. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याने गंभीर समस्या उद्भवू शकतात.

मूत्रमार्गाचे संसर्ग (UTI)

या स्टोनमुळे लघवी रोखली जाते. ज्यामुळे मूत्रमार्गाचा संसर्ग होऊ शकतो. लघवी करताना जळजळ होणं, दुर्गंधीयुक्त लघवी, वारंवार लघवी होणं, ओटीपोटात दुखणं आणि लघवीवाटे रक्त येणं अशी लक्षणं जाणवू शकतात.

हायड्रोनेफ्रोसिस

लघवी करताना अडथळा आल्याने किडनीला सूज येऊ शकते. शिवाय यामुळे मूत्रावाटे रक्तस्राव होणं आणि मळमळणं तसंच उलट्या देखील होऊ शकतात.

यावर उपचार कसे केले जातात?

लहान खडे जास्त पाणी पिऊन आणि वेदनाशामक औषधांनी नैसर्गिकरित्या निघून जातात. मोठ्या स्टोनना शॉक वेव्ह थेरपी (लिथोट्रिप्सी), युरेटेरोस्कोपी किंवा शस्त्रक्रिया सारख्या प्रक्रियांची आवश्यकता भासते मात्र हे तज्ज्ञ ठरवतात. भविष्यात खडे तयार होण्यापासून रोखण्यासाठी किंवा विशिष्ट प्रकारचे स्टोन विरघळण्यासाठी तुम्हाला औषधं देखील लिहून दिली जातात.

मध्यम आकाराच्या स्टोनना युरेटेरोस्कोपी आणि फ्लेक्सिबल युरेटेरोस्कोपीसह RIRS सारख्या लेसर वापरून एंडोरोलॉजिकल प्रक्रियांची आवश्यकता भासू शकते. १.५ सेमी आकारापर्यंतच्या मूत्रपिंडाच्या स्टोनवर डे केअर प्रक्रिया म्हणून रुग्णालयात दाखल न करता एक्स्ट्रा कॉर्पोरियल शॉक वेव्ह लिथोट्रिप्सीद्वारे उपचार केले जाऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vanshawal: जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वंशावळ हवी? पण वंशावळ म्हणजे काय अन् कशी काढायची?

Copper Vessel Water: तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे आरोग्यासाठी घातक? जडू शकतात हे गंभीर आजार

Maharashtra Live News Update: एसटी प्रवर्गात समावेश करा, नांदेडमध्ये बंजारा समाज आक्रमक

Heavy Rain : चार दिवसांच्या अतिवृष्टीने सर्वच हिरावले; पिकांसोबत शेतीही गेली वाहून, शेतकऱ्याला अश्रू अनावर

Crime News: वाढदिवसाच्या पार्टीत येण्यास नकार, ५० रुपयांसाठी मित्र बनला हैवान, छातीत भोसकला चाकू

SCROLL FOR NEXT