Signs of a stroke: ब्रेन स्ट्रोक येण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' मोठे बदल; सामान्य समजून दुर्लक्ष करू नका

Brain stroke symptoms: ब्रेन स्ट्रोक किंवा मेंदूचा झटका हा एक अत्यंत गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास किंवा ती फुटल्यास हा स्ट्रोक येतो.
Signs of a stroke
Signs of a strokesaam tv
Published On
Summary
  • ब्रेन स्ट्रोक हा गंभीर आणि वाढता आजार आहे.

  • रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येऊन स्ट्रोक होतो.

  • चेहरा वाकडा पडणे स्ट्रोकचे प्रमुख लक्षण आहे.

आजच्या काळात ब्रेन स्ट्रोक ही एक गंभीर समस्या बनली आहे. इतकंच नाही तर ही समस्या झपाट्याने वाढत असल्याचं चित्र सध्या दिसून येतंय. जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या आकडेवारीनुसार, दरवर्षी जगभरात लाखो लोक स्ट्रोकचे बळी ठरतात. भारतातसुद्धा ही समस्या वेगाने वाढते आहे.

ब्रेन स्ट्रोकच्या समस्येमध्ये मेंदूमधील रक्तवाहिन्यांमध्ये (Blood Vessels) अडथळा निर्माण होतो किंवा त्या फुटतात. त्यामुळे मेंदूकडे जाणाऱ्या रक्तपुरवठ्यावर परिणाम होतो. परिणामी ब्रेन सेल्सना पुरेसा ऑक्सिजन आणि ऊर्जा मिळत नाही. परिणामी त्या मरण पावतात.

Signs of a stroke
Heart disease risk: छातीत दुखेपर्यंत वाट पाहू नका...! ताण-जीवनशैलीचा तरूणांच्या हृदयावर कसा होतो परिणाम, तज्ज्ञांनी सांगितली कारणं

अनेकांना स्ट्रोक हा अचानक होणारा आजार वाटतो. पण प्रत्यक्षात शरीर आधीपासूनच त्याची काही लक्षणं दिसत असतात. जर हे संकेत वेळेत ओळखले आणि त्वरित डॉक्टरांकडे पोहोचलं तर मृत्यू टाळता येतो आणि रुग्णाचा जीव वाचतो.

स्ट्रोक होण्यापूर्वी दिसणारी प्रमुख लक्षणं

चेहरा वाकडा होणं (Facial Drooping)

अचानक चेहऱ्याचा एक भाग वाकडा दिसणं किंवा हसण्यात अडचण येणं, हे स्ट्रोकचं पहिलं लक्षण असू शकतं.

Signs of a stroke
Heart attack symptoms women: महिलांमध्ये दिसणारी हार्ट अटॅकची लक्षणं पुरुषांपेक्षा का वेगळी असतात? पाहा महिलांच्या शरीरात कोणते बदल होतात

हात-पाय सुन्न पडणं (Weakness in Limbs)

हात किंवा पाय अचानक सुन्न पडणं, कमजोरी येणं, विशेषतः शरीराच्या एका बाजूला हा त्रास दिसणं हे महत्त्वाचं लक्षण आहे.

Signs of a stroke
Heart attack symptoms: छातीत दुखण्याव्यतिरीक्त हार्ट अटॅकची 'ही' इतरंही लक्षणं दिसतात; रात्रीच्या वेळेस होणारे बदल पाहा

बोलण्यात अडचण येणं

अचानक नीट बोलता न येणं, आवाज अडखळणं किंवा शब्द स्पष्ट न उच्चारता येणं हे स्ट्रोकचं ठळक लक्षण मानलं जातं.

दृष्टी धूसर होणं

डोळ्यांसमोर अचानक धुकं आल्यासारखं वाटणं, दृष्टी धूसर होणं किंवा अचानक दिसेनासे होणं हाही इशारा आहे.

Signs of a stroke
Chest Pain : छातीत दुखण्याचे कारण हार्ट अटॅक आहे कि गॅस, कसे ओळखाल? जाणून घ्या सविस्तर माहीती

भयंकर डोकेदुखी

कोणताही त्रास नसताना अचानक आणि असह्य डोकेदुखी सुरू होणं हे देखील ब्रेन स्ट्रोकचे लक्षण असू शकते.

संतुलन बिघडणं

अचानक चालण्यात अडचण येणं, गरगरणं किंवा संतुलन सांभाळता न येणं हेही महत्त्वाचे चेतावणीचे चिन्ह आहे.

Signs of a stroke
Gas and chest pain: छातीत वेदना झाल्या तर सावधान! गॅस आणि हार्ट अटॅकमधील खरा फरक समजून घ्या
Q

ब्रेन स्ट्रोक केव्हा होतो?

A

मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास स्ट्रोक होतो.

Q

स्ट्रोकचे सर्वात सामान्य लक्षण कोणते?

A

चेहरा वाकडा पडणे, हात-पाय सुन्न होणे हे सामान्य लक्षण आहे.

Q

बोलण्यात अडचण येणे कोणत्या आजाराचे लक्षण आहे?

A

बोलण्यात अडचण येणे ब्रेन स्ट्रोकचे ठळक लक्षण आहे.

Q

दृष्टी धूसर होणे कोणत्या आजाराचा इशारा आहे?

A

दृष्टी धूसर होणे ब्रेन स्ट्रोकचा गंभीर इशारा आहे.

Q

संतुलन बिघडणे कोणत्या आजाराशी संबंधित आहे?

A

संतुलन बिघडणे ब्रेन स्ट्रोकचे महत्त्वाचे लक्षण आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com