4 day Work week Saam Tv
लाईफस्टाईल

4 day Work week: आठवड्यातून ४ दिवस काम, कामाची गुणवत्ता वाढेल का? ८१ टक्के लोकांना जे वाटतं ते तुम्हालाही वाटतंय का?

CNBC survey For 4 day Work week :सध्याच्या काळात वर्क लाइफ बॅलेंस करणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी अनेक कंपन्यानी ५ दिवसांचा वर्क वीक केला आहे. त्यानंतर आता ४ दिवसांचा वर्क वीक करण्याची मागणी केली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्याच्या काळात वर्क लाइफ बॅलेंस करणे खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या कामाची वेळ आणि कुटुंबासाठी किंवा स्वतः साठीचा वेळा यांची योग्य सांगड घालणे महत्त्वाचे आहे. वर्क लाइफ बॅलेंस व्यवस्थित असावा यासाठीच ५ दिवसांचा वर्क वीक अनेक कंपन्यामध्ये देण्यात आला आहे. यानंतर आता ४ दिवसांचा वर्क वीकसाठी मागणी सुरु झाली आहे. ४ दिवस वर्क वीकमुळे कर्मचाऱ्यांची काम करण्याची गुणवत्ता वाढेल, असे सांगण्यात आले आहे.

४ दिवसांचा वर्क वीक कर्मचाऱ्यांच्या कामाची गुणवत्ता वाढवेल की नाही यासाठी न्यू CNBC/जनरेशन लॅबकडून सर्व्हे करण्यात आला होता. यात १८ ते ३४ वयोगटातील १,०३३ लोकांची मते नोंदवण्यात आली आहे. यापैकी ८१ टक्के लोकांचे असे म्हणणे आहे की, चार दिवसांच्या वर्क वीकमुळे कर्मचाऱ्यांच्या कामाची गुणवत्ता वाढेल. कर्मचारी अजून चांगल्या पद्धतीने काम करतील. तर १९ टक्के लोकांचे म्हणणे आहे की, ४ दिवसांच्या वर्क वीकमुळे कर्मचाऱ्यांची काम करण्याची गुणवत्ता आणि इच्छा खूप कमी होईल.

यूएसएमधील काही कर्मचाऱ्यांनी चार दिवसांचा वर्क वीक करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. यामध्ये असे दिसून आले आहे की, कर्मचाऱ्यांचा फायदा होत आहे. त्याचसोबत कंपनीचा परफॉर्मन्सदेखील वाढला आहे.

या सर्वेक्षणात वर्क फ्रॉम होम चांगले की वर्क फ्रॉम ऑफिस याबाबतदेखील प्रश्न विचारण्यात आले होते. याबाबत जवळपास ६० टक्के लोकांना सांगिते की, ऑफिसमध्ये काम करणे चांगले आहे. तर ४० टक्के लोकांनी वर्क फ्रॉम होम करणे उत्तम असल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच जगभरातील अनेक कंपन्यानी चार दिवसांचा वर्क वीक करण्याचा प्रयोग सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डिसीपीच्या गाडीलाच ठोकलं

पुण्यात मद्यधुंद चालकाचा प्रताप! थेट वाहतूक विभागाच्या डीसीपींच्या गाडीला धडक; मुलगी जखमी

Mrunal-Bipasha: मृणाल बिपाशाच्या वादात हिना खानची एन्ट्री; अभिनेत्री म्हणाली, 'मी अशा चुका केल्या...'

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक, एक्सप्रेस गाड्यांचा खोळंबा, लोकलवरही परिणाम

भारताला धमकावणारे ट्रम्प रशियाच्या पुतिनसमोर शांत; 'पीसमेकर' प्रतिमेला धक्का, भेटीचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT