DCW Employees Fired: दिल्ली महिला आयोगातील २२३ कर्मचारी बडतर्फ.. उपराज्यपालांची मोठी कारवाई; कारण काय?

Delhi Mahila Ayog News: राष्ट्रीय महिला आयोगाने नियुक्त्या केलेल्या २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं आहे. नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
DCW Employees Fired:
DCW Employees Fired:Saamtv

दिल्ली|ता. २ मे २०२४

राजधानी दिल्लीमधील आप सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने नियुक्त्या केलेल्या २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं आहे. नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या नायब राज्यपालांनी दिल्ली महिला आयोगाच्या कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. दिल्लीचे एलजी विनय सक्सेना यांनी दिल्ली महिला आयोगाच्या २२३ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. विनय सक्सेना यांच्या आदेशानंतर दिल्ली महिला आयोगाने आपल्या २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरुन काढून टाकले आहे.

या सर्व कर्मचाऱ्यांची नियुक्ती दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी केली होती. त्यावेळी स्वाती मालीवाल यांनी नियमांच्या विरोधात जाऊन परवानगी न घेता त्यांची नियुक्ती केल्याचा आरोप करत ही कारवाई करण्यात आली आहे.

DCW Employees Fired:
Pune Railway : रेल्वेत ३५ हजार फुकटे प्रवाशी; एकाच महिन्यात ३ कोटी १२ लाखाचा दंड वसूल

या कारवाईचे कारण स्पष्ट करताना, महिला आयोगाच्या अध्यक्षांनी वित्त विभागाच्या मंजुरीशिवाय या नियुक्त्या केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच त्यांना कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्याचे अधिकार नव्हते. केवळ ४० पदे भरण्याची मंजुरी असताना भरतीपूर्वी, नेमक्या किती पदांची आवश्यकता आहे हे जाणून घेण्यासाठी कोणतेही मूल्यांकन केले गेले नाही, असे आरोप करण्यात आले आहेत.

दरम्यान, आम आदमी पक्षाने २०१५ मध्ये स्वाती मालीवाल यांना दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त केले होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी महिलांशी संबंधित अनेक मोठे प्रश्न मांडले. राज्यसभेचे उमेदवार बनल्यानंतर स्वाती मालीवाल यांनी जानेवारी 2024 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

DCW Employees Fired:
Nashik News: हृदयद्रावक! खेळता खेळता तलावात पडले, बहीण भावाचा करुण अंत; नाशिक हळहळलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com