Pune Railway : रेल्वेत ३५ हजार फुकटे प्रवाशी; एकाच महिन्यात ३ कोटी १२ लाखाचा दंड वसूल

Pune News : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. यात सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने रेल्वेतील प्रवाशांची संख्या आणखीन वाढली आहे.
Pune Railway
Pune RailwaySaam tv

पुणे : रेल्वेच्या गर्दीत अनेकजण तिकीट न काढताच प्रवास करत असतात. अशा फुकट्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई केली जात असते. अशाच प्रकारे (Pune) पुणे रेल्वे विभागात एप्रिल २०२४ मध्ये तिकीट तपासणी दरम्यान ३५ हजार १२९ प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून तब्बल ३ कोटी १२ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.

Pune Railway
Chikhaldara Temperature : चिखलदराचे तापमान ३९ अंशावर; तापमान वाढल्याने विदर्भातील थंड हवेचे ठिकाण पडलं ओस

रेल्वेने (Railway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. यात सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने रेल्वेतील प्रवाशांची संख्या आणखीन वाढली आहे. दरम्यान उन्हाळी सुट्या असल्याने पर्यटनासाठी निघणारे प्रवाशी देखील अधिक असून यासाठी बहुतांश प्रवाशी आरक्षण करून घेत असतात. तर (Pune Railway) काही प्रवाशी हे विना तिकीट प्रवास करत असतात. तरी रेल्वे प्रशासनाकडून चेकिंग होत असताना देखील बिनधास्त विना तिकीट प्रवास करत असतात. अशांवर पुणे विभागाने एप्रिल महिन्यात मोठी कारवाई करत दंड वसूल केला आहे. 

Pune Railway
Agriculture News : उन्हाळी मुगावर करपा रोगाचा प्रादुर्भाव; उत्पादनात घट होण्याची शक्यता

विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या ३५ हजार १२९ इतकी आहे. तर १४ हजार ४६३ प्रवाशांना अनियमित प्रवासासाठी ९३ लाख ९० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तर सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या २४३ प्रवाशांकडून ३३ हजार ६९० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इन्दू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने आणि तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com