Agriculture News : उन्हाळी मुगावर करपा रोगाचा प्रादुर्भाव; उत्पादनात घट होण्याची शक्यता

Washim News : खरीप हंगामात लागवड करण्यात आलेल्या मूग- उडीदाचे यंदा अपेक्षित उत्पन्न आले नाही. यातच यंदा पावसाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट झाल्याचे पाहण्यास मिळाले
Agriculture News
Agriculture NewsSaam tv

मनोज जयस्वाल 

वाशिम : अनेक शेतकरी उन्हाळी मुगाची लागवड करत उत्पन्न घेत असतात. वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी मुगाचं उत्पादन घेतलं जाते. मात्र यंदाच्या (Washim) हंगामात लागवड करण्यात आलेल्या मुगावर विषाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव पडला आहे. यामुळे उत्पादनात देखील घाट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Agriculture News
Ghati Hospital : घाटी रुग्णालयातील नर्सेसचे काम बंद; मनुष्यबळ वाढविण्याची मागणी 

खरीप हंगामात (Kharif Season) लागवड करण्यात आलेल्या मूग- उडीदाचे यंदा अपेक्षित उत्पन्न आले नाही. यातच यंदा पावसाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट झाल्याचे पाहण्यास मिळाले. दरम्यान काही शेतकरी हे उन्हाळी मुगाची लागवड केली आहे. यातून चांगले उत्पादन मिळत असते. वाशीम जिल्ह्यातील शेतकरी उन्हाळी मुगाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत असतात. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील या मुगाची लागवड करण्यात आली आहे. परंतु त्यावर रोग पडल्याने शेतकरी (Farmer) चिंतेत सापडला आहे. 

Agriculture News
Chikhaldara Temperature : चिखलदराचे तापमान ३९ अंशावर; तापमान वाढल्याने विदर्भातील थंड हवेचे ठिकाण पडलं ओस

यंदाच्या हंगामात वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने मूग पिकावर विषाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या औषधांची फवारणी करूनही करपा रोग आटोक्यात येत नसल्यानं शेतकरी हवालदील झाला असून कृषी विभागानं या संदर्भात योग्य मार्गदर्शन करावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com