Chikhaldara Temperature : चिखलदराचे तापमान ३९ अंशावर; तापमान वाढल्याने विदर्भातील थंड हवेचे ठिकाण पडलं ओस

Amravati News : राज्यातील बहुतांश शहरातील तापमान हे ४० अंशाच्या जवळपास पोहचले आहे. तर काही ठिकाणी तर पारा ४२ अंशाच्या वर गेला आहे.
Chikhaldara Temperature
Chikhaldara TemperatureSaam tv
Published On

अमर घटारे 
अमरावती
: तापमानाचा पारा यंदा अधिक प्रमाणात तापत असून जणू काही सूर्य आह ओकत असल्याचा अनुभव येत आहे. (Amravati) राज्यातील सर्वच शहरातील तापमान ४० अंशाच्या जवळ पोहचले असून विदर्भाचे नंदनवन समजल्या जाणार्या व थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा पर्यटन स्थळ देखील तापमान वाढीमुळे पूर्णपणे ओस पडलं आहे.  

Chikhaldara Temperature
Navi Mumbai News : अतिरिक्त फी न भरल्याने दीड हजार विद्यार्थ्यांचे निकाल थांबवले; संतप्त पालकांनी गाठले पोलीस ठाणे

राज्यातील बहुतांश शहरातील (Temperature) तापमान हे ४० अंशाच्या जवळपास पोहचले आहे. तर काही ठिकाणी तर पारा ४२ अंशाच्या वर गेला आहे. यामुळे बाहेर पडणे देखील आता कठीण झाले आहे. यात विदर्भातील थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणाऱ्या चिखलदरा येथील तापमान देखील ३८ ते ३९ डिग्रीवर गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. तर पर्यटकांअभावी (Chikhaldara) चिखलदरामध्ये शुकशुकाट बघायला मिळतो आहे. 

Chikhaldara Temperature
Ghati Hospital : घाटी रुग्णालयातील नर्सेसचे काम बंद; मनुष्यबळ वाढविण्याची मागणी 

अमरावतीचे तापमान ४३ अंशावर 

तसेच अमरावती शहरात आज पारा ४३ डिग्रीवर गेला आहे. त्यामुळे अमरावती शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. तर उन्हाचा तडाखा वाढल्याने जिल्हा रुग्णालयात तसेच तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात उष्माघात कक्ष तयार करण्यात आले आहे. तर शक्य असल्यासच दुपारी घराबाहेर पडा असं आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com