Navi Mumbai News : अतिरिक्त फी न भरल्याने दीड हजार विद्यार्थ्यांचे निकाल थांबवले; संतप्त पालकांनी गाठले पोलीस ठाणे

Navi Mumbai : नवी मुंबईच्या उरणमधील यूईएस इंग्रजी माध्यमाच्या शाळा व्यवस्थापनाने अतिरिक्त फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल देण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला
Navi Mumbai News
Navi Mumbai NewsSaam tv
Published On

सिद्धेश म्हात्रे 
नवी मुंबई
: शालेय परीक्षांचे निकाल जाहीर करत विद्यार्थ्यांना निकालांचे वाटप करण्यात आले. मात्र शाळा प्रशासनाकडून (Navi Mumbai) आकारण्यात आलेली अतिरिक्त फी भरली नसल्याने विद्यार्थ्यांचे निकाल रोखून धरण्यात आले आहेत. असे साधारण दीड हजार (Student) विद्यार्थ्यांचे निकाल शाळेने रोखून धरल्याचे प्रकार उरण येथे समोर आला आहे.   

Navi Mumbai News
Sanjay Raut: वाढलेला आकडा आला कुठून? मतदानाच्या टक्केवारीवरून संजय राऊतांचा गंभीर आरोप

नवी मुंबईच्या उरणमधील यूईएस इंग्रजी माध्यमाच्या (School) शाळा व्यवस्थापनाने अतिरिक्त फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल देण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला. यात ओळखपत्राचे ५५० रुपये, डायरीचे १०० आणि ई- लर्निंगचे १२०० रुपये अशी अतिरिक्त फी शाळा व्यवस्थापनाकडून वसूल करण्यात येते. मात्र ही अतिरिक्त फी (School Fees) भरण्यास शाळेतील निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांच्या पालकांचा विरोध होता. यामुळे पालकांनी फी भरली नाही.  

Navi Mumbai News
Dhananjay Mahadik Vs Satej Patil: मुश्रीफांवर झालेल्या अन्यायाचा धनंजय महाडिकांनी वाचला पाढा, कागलकरांना वचपा काढण्याचं केलं आवाहन

पालकांची पोलिसात धाव 

दरम्यान शाळेचा अंतिम परीक्षेचा निकाल वाटपावेळी शाळा व्यवस्थापनाने फी साठी अडवणूक करत निकाल दिला नाही. निकाल न दिल्या प्रकरणी पालकांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी पोलिस ठाण्यात धाव घेतली. यानंतर पोलीसांनी मध्यस्थी करत शाळा प्रशासनाला गुन्हा दाखल करण्याची तंबी दिली. यावेळी शाळा प्रशासनाने नमती भूमिका घेत कोणतीही अतिरिक्त फी न भरता निकाल देण्याचे मान्य केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com