विजय पाटील साम टीव्ही, सांगली
निवडणूक आयोगाने (Election Commision) उशिरा मतदानाची टक्केवारी जाहीर केल्यामुळे जोरदार टीका केली जात आहे. कोणती तरी अदृश्य शक्ती निवडणूक आयोगाला निवडणूक आयोगाला वापरत असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे. कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाला आघाडी द्यायची, कुणी जिंकायचं आणि कुणाला मागं टाकायचं, पाकिस्तानात हे लष्कर ठरवतं. तसं महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोग ठरवत आहे, असं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे.
मतदान कमी झाल्यामुळे अनेक जिल्ह्यात भाजप पक्ष पिछाडीवर पडला, असे विश्लेषण आले. त्यानंतर तब्बल अकरा दिवसांनी त्या सर्व मतदारसंघात नवीन आकडे समोर आले आहेत. आणि कुठे ५२ टक्क्यांचे ६० टक्के तर कुठे ५४ टक्क्याचे ७४ टक्के झाले आहेत. अकरा दिवसांमध्ये वाढलेले आकडे आले कुठून असा सवाल राऊतांनी विचारला आहे. सांगलीमध्ये संजय राऊत बोलत (Sanjay Raut Allegation On Voting) होते.
जेव्हा मतपत्रिकेवर मतदान करत होतो, त्यावेळी सुद्धा संध्याकाळी सात वाजेपर्यंत मतदान किती झाले? याचे आकडे जाहीर होत होते. परंतु आता देशातील निवडणूक आयोग हे गुदमरले (Sanjay Raut News) आहे. पाकिस्तानच्या लष्करी राजवटीप्रमाणे दबावाखाली निवडणूक आयोग काम करत आहे. निवडणूक आयोगाने माती खाल्ली आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
तसेच निवडणूक प्रक्रियेमध्ये (Lok Sabha 2024) पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यानंतर सहा ते सात टक्के मतदान 11 दिवसांनी वाढला आहे, असा गंभीर आरोप देखील निवडणूक आयोगावर संजय राऊत यांनी केला आहे. अदृश्य शक्ती निवडणूक आयोगाला निवडणूक आयोगाला वापरत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना मतदानाच्या टक्केवारीवरून गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.