Sanjay Raut: महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या लढ्यात शिवसेना नेहमीच पुढे; संजय राऊतांनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

Sanjay Raut Speech On Maharashtra Din: आज मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये बोलताना संजय राऊतांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या लढ्यात शिवसेना नेहमीच पुढे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
 संजय राऊत
Sanjay RautYandex

महाराष्ट्राला खूप मोठा संघर्ष करावा लागला. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी 107 हुतात्म्यांना बलिदान द्यावं लागलं, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. आज मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले की, आजच्या दिवशी गुजरात राज्याची देखील निर्मिती झाली आहे. त्यामुळे गुजरातच्या बांधवांना देखील शुभेच्छा.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, अनेक व्यापाऱ्यांची मुंबईवर वक्रदृष्टी राहिली आहे. ती आज देखील कायम आहे. काल रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हजारो शिवसैनिकांचा हुतात्मा चौकात गेले. तेथे त्यांनी अभिवादन (Sanjay Raut On Maharashtra Din) केलं. महाराष्ट्राचं अखंड वैभव टिकवण्यासाठी ही लढाई पुन्हा नव्याने सुरू झाली आहे.

काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी (Maharashtra Politics) ठामपणे उभे असल्याचं संजय राऊतांनी यावेळी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या लढ्यात शिवसेना नेहमीच पुढे असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र झोपला नाही, हा इतिहास (Sanjay Raut News) आहे. हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांपासून आहे. महाराष्ट्र नेहमी लढत असल्याचं यावेळी राऊतांनी बोलताना म्हटलं आहे.

 संजय राऊत
Sanjay Raut: बारामतीत महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई... सासवडच्या सभेत संजय राऊतांचे धडाकेबाज भाषण; PM मोदी, अजित पवारांवर टीकास्त्र

यावेळी राऊत म्हणाले की, शिवसेना फडणवीस किती जागा लढत आहेत, त्याचा माझ्याकडे नक्की आकडा नाही. परंतु शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केली आहे. शिवसेना सातत्याने महाराष्ट्रात 21 जागा लढत (Sanjay Raut Criticized Ajit Pawar) आली आहे. शिवसेना फडणवीस गट 12, 13 जागा लढत आहेत, याला लोटांगण म्हणतात, अशी टीका राऊतांनी केलीय. आम्हाला त्यात पडायचं नाही.

अजित पवार यांनी दैवत बदललं आहे. 2024 ला पुन्हा सरकार बदलेल. त्यांना परत इडीची नोटीस येईल, त्यावेळी पुन्हा दैवत बदलेलं असेल, अशी जहरी टीका संजय राऊत यांनी अजित पवारांवर केली आहे.

 संजय राऊत
Vinayak Raut Vs Narayan Rane: पक्षप्रमुखांचा रस्ता रोखणारे अजून जन्माला आलेला नाही; विनायक राऊत नारायण राणेंवर बरसले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com