Sanjay Raut Tweet
Sanjay Raut TweetSanjay Raut Tweet

Sanjay Raut: बारामतीत महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई... सासवडच्या सभेत संजय राऊतांचे धडाकेबाज भाषण; PM मोदी, अजित पवारांवर टीकास्त्र

Maharashtra Loksabha Election 2024: शरद पवार यांच्यासह खासदार संजय राऊत, सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप उपस्थित होते. या सभेत बोलताना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अजित पवारांवर जोरदार टीका केली.
Published on

सागर आव्हाड, पुणे|ता. २८ एप्रिल २०२४

बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आज महाविकास आघाडीची जाहीर सभा पार पडत आहे. सासवडमध्ये झालेल्या या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह खासदार संजय राऊत, सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप उपस्थित होते. या सभेत बोलताना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अजित पवारांवर जोरदार टीका केली.

काय म्हणाले संजय राऊत?

सासवडच्या सभेत भाषणापुर्वी संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या एका भाषणाचा व्हिडिओ सभेला दाखवला. या व्हिडिओमध्ये अजित पवार हे शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदेंवर टीका करताना दिसत आहेत. यावरुनच बोलताना संजय राऊत यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली. "तु काय केलं? हा प्रश्न महत्वाचा आहे. तुम्ही काहीचं केलं नाही, आयत्या बिळावर नागोबा;" अशा टोला त्यांनी लगावला.

" बारामतीची लढाई सुप्रिया सुळे किंवा शरद पवार यांची नाही. बारामतीची लढाई महाराष्ट्राच्या अस्तित्वाची आहे. आमच्या पराभवासाठी बारामतीमध्ये ठाण मांडून बसणार. पण आले किती गेले किती भरारा शरद पवार तुमचा अजुनही दरारा, तुम्ही काय आम्हाला संपवणार?" अशा शब्दात राऊतांनी महायुतीवर निशाणा साधला.

Sanjay Raut Tweet
Raigad Lok Sabha: रायगडमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का; महायुतीची ताकद वाढली

शरद पवार काय म्हणाले?

"ही निवडणूक वेगळी आहे. ही निवडणूक देश कोणत्या पध्दतीने चालवायचा हे ठरवणारी निवडणूक आहे. हुकुमशाही ल निमंत्रण देणाऱ्या प्रवृत्तीला बाजूला ढकलायचे असेल तर याचा पराभव केला पाहिजे. नुसती तुतारी नाही, तुतारी हातात घेऊन उभा असलेला माणूस ही आपली खूण आहे. सुप्रियाला निवडून द्या, असे आवाहन यावेळी शरद पवार यांनी केले.

Sanjay Raut Tweet
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला होता.. शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com