रायगड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते रमेश मोरे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. रमेश मोरे हे माणगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. त्यांनी अचानक शिंदे गटात प्रवेश केल्याने रायगडमध्ये महायुतीची ताकद वाढली आहे.
शिंदे गटाचे (Eknath Shinde) आमदार भरत गोगावले यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील माहिती दिली आहे. शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहे. रमेश मोरे हे माणगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. याठिकाणी त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.
काही दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ मोर्बे येथे जाहीर सभा घेतली होती. या सभेचं संपूर्ण नियोजन रमेश मोरे यांनी केले होते. सभेसाठी त्यांनी कार्यकर्त्यांची मोठी जमवाजमव देखील केली होती.
रायगड लोकसभा मतदारसंघ (Lok Sabha Election 2024) राज्यात सर्वाधिक चर्चेत राहिलेला आहे. हा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ताब्यात असून सुनीट तटकरे सध्या विद्यमान खासदार आहेत. यंदाही महायुतीने त्यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीने रायगडमधून अनंत गीते यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे रायगडमध्ये गीते विरुद्ध तटकरे असा थेट सामना रंगणार आहे. सध्या रायगडमध्ये दोन्ही पक्षांनी जोरदार प्रचार सुरु केला असून एकमेकांवर टीकेचा भडीमार करत आहे. रायगडमध्ये कुणाचा विजय होणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.