Cholesterol
Cholesterol Saam Tv
लाईफस्टाईल

Cholesterol : 'या' आयुर्वेदिक पदार्थांच्या मदतीने कमी होईल कोलेस्ट्रॉल, नियमित करा याचे सेवन !

कोमल दामुद्रे

Cholesterol : हार्ट अटॅकने अनेक व्यक्तींना आपला जीव गमवावा लागतो. हृदयविकारासंबंधीत आजाराचे प्रमाण दिवसागणिक वाढतच चालले आहे. यापासून दूर जाण्यासाठी तुम्हाला कॉलेस्ट्रॉलपासून दूर राहणे गरजेचे आहे.

जर तुमच्या शरीरात कोलस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाले आहे तर ते वेळीच आटोक्यात आणले पाहिजे. नाहीतर तुम्हाला तुमचा जीव देखील गमवावा लागण्याची शक्यता आहे.

तुम्ही कोलेस्टेरॉलचे प्रमाण तपासले आहे आणि ते जास्त प्रमाणात आहे तर त्यासाठी कोणतेही औषध खाण्याची गरज नाही. तुमच्या घरात सहज उपलब्ध असलेल्या या पदार्थांचे (Food) सेवन केल्याने देखील कोलस्टेरॉल कमी होऊ शकते.

कोलेस्टेरॉल जास्त वाढले असेल तर तुम्ही आजच आवळा खाण्यास सुरुवात करा. जर तुम्हाला आवळा फळाची चव आवडत नसेल तर तुम्ही आवळा कँडी देखील खाऊ शकता. बाजारात आवळ्याचे अनेक पदार्थ मिळतात त्याचे सेवन देखील करू शकता.

Cholesterol

अर्जुन फळाची साल खाल्याने कोलेस्टेरॉल कमी होते. एक कप दुधात याची साल भिजत ठेवावी आणि नंतर ते दूध (Milk) पिऊन घ्यावे याने कोलेस्टेरॉल कितीही वाढले असले तरी ते लगेच कमी होण्यास मदत होते.

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लसूण फार गुणकारी आहे. दररोज तुम्ही 3 पाकळ्या लसूण खाल्ल्यास कोलेस्टेरॉल लगेचच कमी होते. याने तुम्हाला कधीच हृदयविकाराशी संबंधित अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. तसेच हार्ट अटॅकचा (Heart Attack) धोका याने टाळता येतो.

मसाल्याच्या (Spices) पदार्थांमध्ये असलेलं अद्रक देखील फार उपयुक्त आहे. याचे सेवन केल्याने शरीरात असलेली अतिरिक्त चरबी कमी होते. त्यामुळे कोलेस्टेरॉल सुद्धा कमी होते. तुम्ही चहामध्ये आद्रक टाकून पिऊ शकता.

लिंबूमध्ये क जीवनसत्व असते. त्यामुळे याचे सेवन केल्याने देखील कोलेस्टेरॉल कमी होते. जेवण किंवा सरबतमध्ये लिंबाचा वापर नेहमी केला जातो. जर तुम्हाला जास्त प्रमाणात कोलेस्टेरॉल जाणवत असेल तर तुम्ही लिंबाचा सरबत किंवा त्यांचं लोणचं जेवणात कायम वापरू शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM बिघाड, राडा, तुंबळ हाणामारी, व्हिडिओ आणि आरोपांच्या फैरी; तिसऱ्या टप्प्यात कुठं काय घडलं?

IPL 2024 DC vs RR : एकाच षटकात २ विकेट घेत कुलदीपने पालटली बाजू; घरच्या मैदानावर दिल्लीने राजस्थानचा २० धावांनी केला पराभव

Bhayandar News : सोसायटीचं फायर टेंडर दिलं नाही म्हणून अग्निशमनच्या अधिकाऱ्यांने केली बेदम मारहाण, खजिनदार गंभीर जखमी

Maharashtra Politics: निवडणूक रोखे योजनेत मोठा भ्रष्टाचार, भाजपकडून त्याच पैशाचा पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापर: पृथ्वीराज चव्हाण

BSP National Coordinator : मायावतींनी आकाश आनंद यांना नॅशनल कॉर्डिनेटरपदावरून हटवलं, आता जबाबदारी कोणावर?

SCROLL FOR NEXT