Health Tips : भारतामध्ये हाय कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. अनियमित जीवनशैली आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेणे या कारणांमुळे लोक कोलेस्ट्रॉलचे रुग्ण बनत चालले आहेत.
कोलेस्ट्रॉल हाय ब्लड प्रेशर, वजन वाढणे, किडनीमध्ये प्रॉब्लेम आणि डायबिटीज, त्याचबरोबर हार्ट डीसिज सोबत अनेक आजारांना आमंत्रण देते. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत. जेणेकरून तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल लेवल लवकर कमी होईल.
पाहायला गेलं तर आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. ज्याला गुड कोलेस्ट्रॉल आणि बेड कोलेस्ट्रॉल असे म्हटले जाते. गुड कॉलेज स्टॉल हा आपल्या रक्तामधील जमा असलेली चरबी कमी करण्यास मदत करते आणि आपल्या धमन्यांना साफ ठेवते.
कारण की आपले हृदयामधील रक्तप्रवाह नीट व्हावा म्हणून. अशातच बँड कोलेस्ट्रॉल हा शरीरासाठी अतिशय हानिकारक असतो. बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यावर कोलेस्ट्रॉल धमन्यांमध्ये जमा होते आणि हृदयापर्यंत रक्तप्रवाह फार कमी प्रमाणात पोहोचतो. यामुळे हार्ट अटॅक (Heart Attack), स्ट्रोकचा खतरा वाढतो.
असे भरपूर पदार्थ (Food) आहे ज्यांचे सेवन केल्याने शरीरामधील कोलेस्ट्रॉल लेवल वाढते. जंक फूड, फ्राईड फूड, आईस्क्रीम (Ice-cream) अशा अनेक पदार्थांमुळे शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढ. डायटमध्ये फायबरयुक्त फ्रुट्स, हिरव्या पालेभाज्या आणि इतर धान्य, कडधान्यांच्या सेवनाने तुमच्या शरीरामधील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते. त्याचबरोबर काही फळांमध्ये फायबरची मात्र जास्त प्रमाणात असते. त्यामुळे हे फळ (Fruit) खाल्ल्यानंतर कोलेस्ट्रॉल लेवल प्रमाणात वाढत नाही.
1. एवोकाडो -
या फळाच्या नियमित सेवनाने ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहते. या फळांमध्ये विटामिन k, c, b5, b6, e आणि मोनोअन्सेंचुरेतेड फॅट असते. जे तुमच्या हृदयाला हेल्दी ठेवते. हे फळ तुमच्या शरीरातील गुड कॉलेज स्ट्रॉंग लेवल आणि बॅड कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रित ठेवते.
2. टोमॅटो -
टोमॅटोमध्ये अनेक पोषक तत्वे असतात. टोमॅटोमध्ये विटामिन a, b, k, आणि c असते. जे आपल्या त्वचेसाठी आणि डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर असते. बरोबर हृदयासाठी देखील फायदेशीर असते. याशिवाय टोमॅटोमध्ये पोटॅशियमची मात्रा जास्त प्रमाणात असते. जे कोलेस्ट्रॉल लेवल आणि ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवते.
3. सफरचंद -
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार प्रत्येक व्यक्तीने नियमित सफरचंदाचे सेवन केले पाहिजे. रोज एका सफरचंदाच्या सेवनाने आपण कधीही आजारी पडत नाही. एवढेच नाही तर सफरचंद हे फळ आपल्या शरीरामधील कोलेस्ट्रॉल लेवल कंट्रोलमध्ये ठेवते. चंदन मध्ये फायबरची मात्रा जास्त प्रमाणात असते. यासोबतच हार्टचे मसल्स आणि रक्त कोशिकाना डॅमेज होण्यापासून वाचवते.
4. लिंबूवर्गीय फळे -
लिंबू, संत्रे, मोसंबी यांसारखे आंबट फळ कोलेस्ट्रॉल लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करतात. आंबट फळांमध्ये हेस्पेरीडीन असते. जे हाय ब्लड प्रेशरला नियंत्रण ठेवण्याचे काम करते.
5. पपई -
पपई (Papaya) आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. पपई मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. जे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करते. एका मोठ्या पपईमध्ये 13 ते 14 ग्रॅम फायबर असते. दररोज पपई खाल्ल्याने पचनसंस्था सुधारते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.