Children Care Saam Tv
लाईफस्टाईल

Children Care : कडाकाच्या थंडीमुळे लहान मुलांमध्ये वाढतेय श्वसनाची समस्या आणि फ्लू

Winter Care : सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट पसरली आहे. थंडी वाढली की, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या थंडीचा सर्वांधिक परिणाम हा मोठ्यांसोबत लहान मुलांच्या आरोग्यावरही होताना दिसून येत आहे.

Shraddha Thik

Winter Care Tips :

सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट पसरली आहे. थंडी वाढली की, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या थंडीचा सर्वांधिक परिणाम (Effect) हा मोठ्यांसोबत लहान मुलांच्या आरोग्यावरही होताना दिसून येत आहे.

हिवाळ्यात तापमानात घट झाल्याने मुलांमध्ये पोटाचा फ्लू आणि श्वासोच्छवासाच्या समस्या (Problem) जाणवू लागल्या आहेत. बालरोग तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसात थंडीमुळे मुलांना सर्दी, खोकला आणि ताप असल्याने अनेक पालक मुलांना घेऊन उपचारासाठी जातात. यात 100 पैकी 60 मुलांना पोटाचा फ्लू आणि श्वसनासंबंधी तक्रार असल्याचं दिसून आले आहे.

थंड हवामानामुळे मुलांमध्ये सामान्य सर्दी, फ्लू आणि तीव्र ब्राँकायटिस यांसारख्या श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. काहींना न्यूमोनिया सुद्धा झालेला आहे. कारण हिवाळा हा श्वसनासंबंधी रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस (RSV) या आरोग्याच्या समस्यांना आमंत्रण देतो. हवामानातील सततच्या बदलांमुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत.

झायनोव्हा शालबी रुग्णालयातील बालरोगतज्ञ डॉ. श्रुती घटालिया म्हणाल्या की, “हिवाळ्यात वातावरणात थंडावा असल्याने विषाणूच्या प्रसारासाठी हे वातावरण पोषक असते. लहान मुलं या विषाणूच्या संपर्कात लगेच येतात. त्यामुळे लहान मुलांमध्ये पोटाचा फ्लू, गॅस्ट्रोएन्टेरिटिससंबंधी समस्या आणि श्वसनाचे विकार होण्याची दाट शकता असते. सध्या थंडीमुळे मुलांना सर्दी, खोकला झाल्याने अनेक पालक त्यांना घेऊन रूग्णालयात येत आहेत. थंडीमुळे आजार पडणाऱ्या मुलांची संख्या वाढतेय. यात 60% मुलांना पोटाचा फ्लू आणि श्वसनासंबंधी तक्रार असतात.

अपोलो स्पेक्ट्रा मुंबईच्या इंटरर्नल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. छाया वजा म्हणाल्या की, ‘‘श्वसनासंबंधी एक आजार म्हणजे ब्रॉन्कायलाइटिस, ज्याचा परिणाम लहान मुलांवर आणि लहान मुलांना होतो. या अवस्थेत फुफ्फुसातील लहान वायुमार्गांचा जळजळ होतो, ज्याला ब्रॉन्किओल्स म्हणतात आणि श्वसन सिन्सिशिअल व्हायरस (RSV) मुळे होते. यात मुलांमध्ये खोकल्या किंवा शिंकण्यातील थेंबांद्वारे पसरतो आणि नाक वाहणे, ताप अशी लक्षणं दिसून येतात. हिवाळ्यात मुलांमध्ये श्वसनाच्या आजाराची प्रकरणे एडेनोव्हायरस आणि इन्फ्लूएंझा सारख्या विषाणूंना कारणीभूत ठरू शकतात. याशिवाय थंड हवामानामुळे मुलांमध्ये दम्याचा त्रास वाढू शकतो. ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. सामान्यतः सहा वर्षांखालील मुले प्रभावित होतात. तसेच, वायू प्रदूषणामुळे मुलांमध्ये ही लक्षणे लक्षणीयरीत्या वाढतात. याशिवाय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या मुलांमध्ये ताप, उलट्या, मल सैल, पोटात तीव्र वेदना, खोकला, थंडी वाजून येणे, भूक न लागणे आणि थकवा यांसारखी लक्षणे दिसून येत आहेत.”

डॉ. श्रुती पुढे म्हणाल्या की, “मुलांना संसर्गापासून वाचवण्यासाठी पालकांनी मुलांना गर्दीच्या ठिकाणी आणि मोकळ्या जागेवर नेऊ नये, अस्वच्छ अन्न आणि गाळलेले पाणी खाणे टाळावे, आजारी मुलाला शाळेत पाठवू नये, जेवण्यापूर्वी हात साबणाने आणि पाण्याने धुवावेत. मुलाला पौष्टिक आहार द्या. तुमच्या नियमित आहारात भाज्या आणि फळांचा समावेश करा. या मुलांची काळजी घेताना, हातमोजे आणि मास्कचा वापर करावा आणि वापरलेल्या वस्तूंची सुरक्षितपणे विल्हेवाट लावणे महत्त्वाचे आहे. न्यूमोनिया आणि फ्लू यांसारख्या हंगामी आजारांपासून बचाव करण्यासाठी मुलांना आवश्यक लसी देणे आवश्यक आहे. शाळेत पुस्तके किंवा इतर वस्तू शेअर करणे किंवा इतर मुलांशी हस्तांदोलन टाळा. जास्त दिवस ताप राहिल्यास, ताबडतोब बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या.”

“हिवाळ्यात मुलांना पोटाचा फ्लू होऊ नये, यासाठी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी पालकांनी त्यांना विषाणूच्या संसर्गापासून दूर ठेवले पाहिजे. संक्रमणांचा सामना करण्यासाठी मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवी, याकरता त्यांना पौष्टिक आहार देणे गरजेचं आहे. मुलांना डिहायड्रेशन किंवा सतत उलट्या होत असल्यास तातडीने वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या. वेळीच निदान व उपचार झाल्यास हिवाळ्याच्या महिन्यात पोटातील फ्लूपासून लवकर बरे होण्यास मदत करू शकते,” असेही डॉ. छाया म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात वकीलाला मारहाण

पंतप्रधान स्वतःला देवाचा अवतार समजतात; संजय राऊतांचा राज्यसभेत मोदींवर घणाघात | VIDEO

Trump Tariffs: रशियाशी दोस्ती खटकली, डोनाल्ड ट्रम्प यांची सटकली; अमेरिका भारताच्या वस्तूंवर लावणार 25 टक्के टॅरिफ

Matar Bakarwadi : संध्याकाळच्या नाश्त्याला उपमा पोहे कशाला? झटपट करा खुसखुशीत बाकरवडी

Pune News: धक्कादायक! कारगिल युद्ध लढलेल्या सैनिकाकडे मागितला नागरिकत्त्वाचा पुरावा; घरात घुसून ८० जणांच्या टोळक्याकडून शिवीगाळ

SCROLL FOR NEXT