Shraddha Thik
चहा सगळ्यांनाच आवडतो. क्वचितच असं कुणी असतात ज्याना चहा आवडत नाही.
खासकरून थंडीच्या दिवसात लोक चहाचं जास्त सेवन करतात. चहाशिवाय त्यांच्या दिवसाची सुरूवातच होऊ शकत नाही.
थंडीच्या दिवसात एक कप चहाने तुमच्या अनेक समस्या दूर होतात. चहाला थंडीच्या दिवसात बेस्ट इम्यूनिटी बूस्टर मानले जाते.
थंडीच्या दिवसात आल्याचा चहा प्यायल्याने मन तर शांत होते. पण सर्दी-खोकल्यापासूनही आराम मिळतो. तसेच हिवाळ्यात पुन्हा पुन्हा लघवीला जाण्याची समस्याही दूर होते.
चहामध्ये आलं, लवंग, वेलची टाकून बराच वेळ उकळवतो. असे केल्याने चहामधील टॅनिन बाहेर येते. जे अॅसिडिटीचं मोठं कारण बनते.
टॅनिन एकप्रकारचे अॅंटी-ऑक्सिडेंट आहे. जे चहा पावडरमध्ये आढळते. जेव्हा टॅनिन जास्त प्रमाणात घेतले जाते तेव्हा अॅसिड रिफ्लक्स आणि गॅस तयार होतो.
जर चहा प्यायल्यावर गॅसचा त्रास बराच काळ असेल, तर पोटात सूजही येऊ शकते. त्यामुळे ज्यांना आतड्यासंबंधी समस्या आहे त्यांनी चहाचे सेवन कमी करावे. इतकंच नाही तर जर पोटात इन्फेक्शन असेल तर चहाचे सेवन पूर्णपणे बंदच करावे.