Children Care | मुलांच्या छातीत कफ जमा झालाय? हा घरगुती उपाय करुन पाहाच!

Shraddha Thik

लहान मुलांचे वय

लहान मुलांना वयाच्या 5 ते 7 वर्षापर्यंत सतत सर्दी, कफ, खोकला, ताप असे काही ना काही होतच असते.

Children Care | yandex

धुळीची अलर्जी, विविध विषाणूजन्य समस्या

धुळीची अलर्जी, विविध विषाणूजन्य समस्या, बदलते हवामान अशा कारणांनी मुलांना या समस्या उद्भवतात. काही वेळा हा कफ ठराविक काळाने बरा होतो.

Children Care | yandex

घट्ट कफ छातीत तसाच राहतो?

काही वेळा औषधोपचार करुनही हा घट्ट कफ छातीत तसाच राहतो. अशावेळी वाफारा, शेक देणे, गरम पाणी पिणे असे उपाय केल्यावर हळूहळू बरेच दिवसांनी यावर थोड्या प्रमाणात आराम मिळतो.

Children Care | yandex

कफ, सर्दी किंवा खोकला

पण या काळात मुलांची अजिबातच झोप होत नाही. कफ, सर्दी किंवा खोकला यामुळे त्यांना सतत जाग येत राहते आणि मग सलग झोप मिळत नाही.

Children Care | yandex

कफमुळे अन्न जात नाही

कफमुळे अन्न जात नाही त्यामुळे अंगात ताकद राहत नाही. त्यात खेळणे सतत सुरू असल्याने थकवा येतो. असे सगळे झाले की मुलांच्या एकूणच आरोग्यावर त्याचा विपरीत परीणाम होतो.

Children Care | yandex

विड्याचे पान

खायचे पान म्हणजेच विड्याचे पान यावर अतिशय असरदार ठरते. या विड्याच्या पानाचा वेल आपण घरातही लावू शकतो किंवा पानाच्या दुकानात तर ही पानं अगदी सहज मिळतात.

Children Care | yandex

मोहरीचे तेल

मुलांच्य छातीला हलके मोहरीचे तेल लावायचे. विड्याची 1 किंवा 2 पानं तव्यावर थोडी गरम करायची आणि मुलांच्या छातीवर ही पानं ठेवून द्यायची. सकाळी उठल्यावर मुलांचा कफ पूर्णपणे निघून गेलेला आढळेल.

Children Care | yandex

Next : Parenting Tips | लहान मुलांना चहा प्यायला देता? शरीरावर होऊ शकतो वाईट परिणाम

येथे क्लिक करा...