Parenting Tips | लहान मुलांना चहा प्यायला देता? शरीरावर होऊ शकतो वाईट परिणाम

Shraddha Thik

नाश्त्यासह चहा

पालक मुलांना सकाळी नाश्त्यासह चहा देतात. भारतीय घरांमध्ये चहा हा सगळ्यात जास्त प्रमाणात बनवला जाणारे पेय आहे.

Children Drinking Tea | Yandex

गरम गरम चहा

उन्हाळा असो वा हिवाळा, पावसाळा चहा हा प्यायला जातोच. मुलांना थंड वातावरणात गरम गरम चहा दिला जातो.

Children Drinking Tea | Yandex

चहाची चव

एकदा मुलांना चहाची चव कळाली की मग त्यांना तो नेहमीच प्यावा वाटतो आणि मग मुलांचं सकाळ- संध्याकाळ पालकांसोबत चहा पिणे सुरू होते.

Children Drinking Tea | Yandex

लोहाची कमतरता

चहामध्ये टॅनिन असते. अन्नपदार्थांमधील लोह शोषून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये टॅनिन अडथळा निर्माण करते. त्यामुळे लहान मुलांनमध्ये लोहाची कमतरता जाणवते. त्यामुळे बऱ्याचदा चहा पिणारी लहान मुलं ॲनिमिक किंवा अशक्त असल्याचं दिसून येतं.

Children Drinking Tea | Yandex

डिहायड्रेशन

बहुतांश लहान मुलांना डिहायड्रेशनचा त्रास होत असतो. त्यात जर मुलं चहा पित असतील तर त्यांना इतर मुलांच्या तुलनेत वारंवार लघवीला जावं लागतं. आणि त्यांचा डिहायड्रेशनचा त्रास वाढतो.

Children Drinking Tea | Yandex

चहामध्ये कॅफिनचे प्रमाण

चहामध्ये कॅफिनही काही प्रमाणात असते. यामुळे मुलांना अस्वस्थ होणं, रात्री लवकर झोप न येणं, एन्झायटी किंवा चंचलपणा वाढणं असा त्रासही होऊ शकतो.

Children Drinking Tea | Yandex

ॲसिडिटीचा त्रास

चहामधील काही घटकांमुळे मुलांना कमी वयातच वारंवार ॲसिडिटीचा त्रास होतो. चहामध्ये मुलांच्या दृष्टीने कोणतेही पोषणमुल्य नसते. त्यामुळे लहान मुलांना चहा देणं पुर्णपणे टाळलं पाहिजे, असं आहारतज्ज्ञ सांगतात.

Children Drinking Tea | Yandex

Next : Habit Changes | 2024 मध्ये भरभरुन यश हवंय? या 5 गोष्टींची सवयच लावून घ्या

येथे क्लिक करा...