Gautam Gaikwad: सिंहगडावरून तरुण बेपत्ता कसा झाला? ५ दिवसांत काय-काय घडलं, गौतम गायकवाडने सांगितला थरारक किस्सा

Gautam Gaikwad Missing : पुण्यातील सिंहगडावरून ५ दिवसांपासून बेपत्ता असलेला तरुण गौतम गायकवाडनं थरारक अनुभव सांगितलाय. रोमांचक अनुभव सांगत त्याने दरीत कसे दिवस काढले याची माहिती वृत्तवाहिनीला दिली.
Gautam Gaikwad Missing
Thrilling rescue: Missing youth Gautam Gaikwad found injured after 5 days in Sinhagad valley.saamtv
Published On
Summary
  • गौतम गायकवाड पाच दिवसांपासून सिंहगडावर बेपत्ता होता.

  • तो तानाजी कड्याजवळ दरीत जखमी अवस्थेत सापडला.

  • बचाव पथकाने मोठ्या प्रयत्नानंतर त्याला शोधलं

मागील पाच दिवसांपासून बेपत्ता असलेला गौतम गायकवाड सिंहगडाच्या दरीत जखमी अवस्थेत सापडला. गौतम हैदराबादवरून आपल्या मित्रांसोबत पुण्याच्या सिंहगडावर फिरायला आला होता. गौतम गायकवाड तेथून संशयास्पद गायब झाला होता. त्याच्यासोबत काही घातपात घडला असावा असा संशय व्यक्त केला जात होता. गौतम गायकवाड ज्या दिवसापासून गायब झाला होता, त्या दिवसापासून बचाव पथक त्यांच्या शोध घेत होते. गौतम शेवटी ५ दिवसानंतर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाजवळ सापडला.

या दिवसात त्यांच्यासोबत काय घडलं तो कसा दरीत कोसळला याचा थरार गौतम गायकवाड याने सांगितलाय. गौतम सिंहगडाच्या तानाजी कड्याजवळ तो पाच दिवसांपासून दरीत अडकून पडला होता. त्याच्या शरीरावर अनेक जखमा असून, सध्या त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Gautam Gaikwad Missing
Gautam Gaikwad: सिंहगडावरून पडला,पाच दिवस जंगलातच; गौतम गायकवाडच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट!

कडावरून कसा कोसळला गौतम ?

गौतमने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, 'तो मित्रांसोबत सिंहगडावर फिरायला गेला होता. त्यावेळी लघुशंकेसाठी तो बाजूला गेला, त्यावेळी त्याला तानाजी कड्याजवळ एका ठिकाणी एक कुत्रा अडकलेला दिसला. त्याला वाचवण्यासाठी खाली उतरत असताना गौतमचा पाय घसरला आणि तो दरीत कोसळला.

दरीचा कडा सरळ असल्याने त्याला परत वरती चढता आले नाही. त्याने मदतीसाठी खूप आवाज दिले परंतु जोरदार पाऊस सुरू असल्याने त्याचा आवाज कोणापर्यंतच पोहोचला नाही. त्यामुळे त्याला त्याच अवस्थेत दरीत राहावे लागले होते.

बेपत्ता होण्यावरून तर्क-वितर्क

सुरुवातीला कर्जाच्या समस्येमुळे गौतमने बेपत्ता होण्याचा बनाव रचल्याची चर्चा होती. सीसीटीव्ही फुटेजमुळे या संशयाला वाव मिळाला होता. पण गौतमने स्वतः सांगितलेली ही थरारक कहाणी समोर आल्याने हा सगळा प्रकार नेमका काय होता, हे स्पष्ट झालंय.

पाच दिवस उपाशी आणि अंगावर जखमा?

दरीमध्ये पडल्यानंतर त्याला एका सुरक्षित ठिकाणी झोप लागली. जाग आल्यावर त्याला काहीच दिसत नव्हतं. त्यानंतर हळूहळू पुढे सरकू लागला. दरीत त्याला काहीच अन्न मिळालं नाही. पाच दिवस गौतम उपाशी राहिला. अखेर पाच दिवसांनी त्याला काही लोकांचा आवाज आला. आवाज येत असलेल्या दिशेने तो चालत गेला. त्यावेळी त्याला दोन लोक दिसले. त्यांनी त्याला पाहिले आणि मदत केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com