
केंद्र सरकारकडून ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालणारे विधेयक मंजूर
विधेयक मंजूर झाल्यामुळे बीसीसीआयला मोठा आर्थिक फटका.
ड्रीम ११नंतर आता माय ११ सर्कलदेखील करार तोडण्याच्या मार्गावर आहे
बीसीसीआयला आयपीएल २०२६ साठी नव्या स्पॉन्सरची गरज भासणार आहे
मोदी सरकारने संसदेत ऑनलाईन गेमिंग बिल २०२५ मंजूर केलं. मोदी सरकारच्या निर्णयाने ऑनलाइन गेमिंग कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. दुसरीकडे या ऑनलाईन गेमिंग कंपन्यांमुळे बीसीसीआयलाही आर्थिक फटका दिसत आहे. ड्रीम ११ ने काही दिवसांपूर्वी जर्सी स्पॉन्सरचा करार मोडला. त्यानंतर बीसीसीआयला आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. बीसीसीआयला आता १२५ कोटी रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
ड्रीम ११ नंतर आता माय ११ सर्कलने देखील आयपीएलसाठी बीसीसीआयसोबत १२५ कोटी रुपयांचा करार केला होता. मात्र, ऑनलाइन गेमिंग बिल मंजूर झाल्याने माय ११ सर्कलवर देखील संकट उभं ठाकलं आहे. त्यामुळे आता दुसरी कंपनी देखील बोर्डाची साथ सोडण्याची शक्यता आहे.
आयपीएल २०२६ साठी आता आता बोर्डाला नव्या पार्टनरची गरज लागणार आहे. बोर्डासहित काही खेळाडूंनाही आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. अनेक खेळाडूंनी ड्रीम ११ आणि माय ११ सर्कलसोबत करार केला होता. दोन्ही कंपन्या बंद झाल्यास खेळाडूंनी कोट्यवधींचे करार संपुष्टात येतील.
आयपीएलदरम्यान बोर्डासहित फ्रेचाइजींना नुकसान झेलावं लागणार आहे. नव्या बिलचा आयपीएलमधील ३ संघावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यात KKR, LSG आणि SRH या नावांचाही समावेश आहे. फ्रेंचाइजींना देखील आयपीएल २०२६ सुरु होण्याआधी नवे स्पॉन्सर शोधावे लागतील. टीम इंडियाच्या जर्सी स्पॉन्सरच्या शर्यतीत अनेक नावांची एंट्री झाली आहे. यात टोयोटा कंपनीचं नाव आघाडीवर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.