
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस
वैष्णो देवी मंदिर यात्रेच्या मार्गावर भूस्खलन
भूस्खलन झाल्याने भाविक जखमी झाल्याची शक्यता
भाविकांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासन सज्ज
जम्मू-काश्मीरला पावसाने झोडपून काढलं आहे. जम्मूमधील मुसळधार पावसामुळे वैष्णो देवी मंदिर यात्रेच्या मार्गावर मंगळवारी भूस्खलन झालं. अर्धकुवारीजवळ भूस्खलनाची घटना घडली. या मार्गावर हजारो भाविकांची रेलचेल असते. याच भागात भूस्खलन झाल्याने अनेक भाविक जखमी झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
वैष्णो देवीच्या यात्रेच्या मार्गात भूस्खलन झालेल्या ठिकाणी काही भाविक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांना तातडीने कटरा येथील रुग्णालयात करण्यात आल. या दुर्घटनेनंतर सुरक्षा दलाने तातडीने बचाव कार्य सुरु केलं. तर इतर भाविकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचं काम सुरु आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांसोबत एनडीआरएफची टीम देखील घटनास्थळी अलर्ट मोडवर आहे.
भूस्खलनाचे फोटो देखील समोर आले आहेत. यात्रेच्या मार्गावर मातीचा ढिगारा पडलेला दिसत आहे. मुसळधार पावसादरम्यान सुरक्षा कर्मचारी भाविकांना सुरक्षित ठिकाणी नेत आहेत. दुसरीकडे जम्मूतील सुंजवा भागात पुराचं पाणी घुसलं आहे. त्यामुळे स्थानिकांच्या घरांचंही मोठं नुकसान झालं आहे.
भाविकांच्या सुरक्षेसाठी वैष्णो देवी यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. अर्धकुंवारी ते भवनपर्यंतचा मार्ग बंद करण्यात आला आहे. दुसऱ्या ट्रॅकवरील भाविकांची येजा बंद करण्यात आली आहे. या घटनेनंतर भाविकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलंय.
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये आभाळ फाटल्याने १० हून अधिक घरांचं नुकसान झालं आहे. याचदरम्यान दुसरीकडे वैष्णो देवी यात्राही तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. रामबन जिल्ह्यातील चंदरकोट, केला मोड आणि बॅटरी चष्मा या डोंगरावरील दरड कोसळल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून आज मंगळवारी सकाळी २५० किलोमोटर दूर जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.