laxman Hake News
laxman Hake Saam tv

laxman Hake : जरांगेंची चाटायची चाटा, पण आधी राजीनामा द्या; 'पापड्या' म्हणत हाकेंचा राष्ट्रवादीच्या आमदारावर हल्लाबोल,VIDEO

laxman Hake on Marathi Jarange : राज्यात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांनी एकमेकांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
Published on
Summary

आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला

मराठा आरक्षणावरून लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल

मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांनी एकमेकांविरोधात आक्रमक

लक्ष्मण हाकेंचा राष्ट्रवादीच्या आमदारावर हल्लाबोल

अक्षय शिंदे, साम टीव्ही

जालना : 'विजयसिंह पंडित पापड्या आमदार असून त्यांनी राजीनामा देऊन मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी व्हावे. त्यांना मनोज जरांगे यांची चाटायची चाटावी, पण त्या आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशा शब्दात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर टीका केली. ते जालन्यातली वडीगोद्रीत बोलत होते.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकीकडे मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी मुंबईत येऊन आंदोनलाचा इशारा दिला आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला राजकीय वर्तुळातूनही पाठिंबा मिळत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांनीही मनोज जरांगे यांना पाठिंबा जाहीर केला. विजयसिंह पंडित यांच्या भूमिकेवर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी तोफ डागली आहे.

laxman Hake News
ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये दारूचे सेवन वाढलं; काँग्रेसच्या बड्या नेत्याचं वक्तव्य चर्चेत,VIDEO

मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना लक्ष्मण हाके म्हणाले, 'मनोज जरांगे उपोषणवीर नाहीत, सलाईन वीर असून सलाईन लावून उपोषण करतात. सरकार उलथून टाकायला मनोज जरांगे यांच्याकडे किती आमदार आहेत. मुख्यमंत्र्यांची आयमाय काढणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत सहभागी असणाऱ्या अजित पवारांचे आमदार जरांगेंच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतात. अजित पवारांचे आमदार मुख्यमंत्र्यांना शिव्या देणाऱ्यांच्या आंदोलनात सहक्रिय सहभाग घेतात.

'वाळूच्या गुन्ह्यातील आरोपींच्या चांडाळ चौकडीतच मनोज जरांगे बसलेले आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेचे स्वागत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील मराठा एकच आहे. सरकार 14-15 टक्के लोकांच्या मताला एवढं घाबरत असेल, तर आमच्याकडे 50-60 टक्के मतांची व्होट बँक आहे. ते फक्त झोपलेले आहेत. त्यांना जागे करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ओबीसी रक्षणासाठी आमचा बळी आणि जीव गेला तरी चालेल, असे हाके म्हणाले.

laxman Hake News
Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

'ज्या दिवशी आमचं ओबीसी व्होट बँक जागं होईल, त्या दिवशी त्यांना एखाद्या गावचा सरपंच सुद्धा आम्ही होऊ देणार नाही, असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी मोठा इशारा दिला.

'आमच्यावर गुन्हा दाखल झाला तर आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत. आम्हाला अटक करा.. आमच्या बाबतची तत्परता दाखवतात, तशी तत्परता जरांगेंच्या बाबतीत दाखवा. जरांगे गेली दोन वर्ष महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेत. साडे 28 किलोचे भूत, गृह विभाग हजारोंचा पोलीस प्रशिक्षित विभाग, महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडवत आहे. सामान्य माणूस वेठीला धरत घर प्रॉपर्टी जाळत आहे. तुम्ही आजपर्यंत त्याला एकदाही अटक केली नाही. जरांगे नावाच्या खुळचट माणसाला एक न्याय आणि आमच्या सारख्या कायदा पाळणाऱ्या माणसाला वेगळा न्याय, कायद्यामध्ये पण तुमचा दूजाभाव आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com