manoj jarange News
manoj jarange Saam tv

Manoj Jarange : जरांगेंच्या विरोधात सोशल मीडियावर कमेंट करणं पडलं महागात; समर्थकांनी भर चौकात तरुणाला काळं फासलं

manoj jarange Latest News : मनोज जरांगेंच्या विरोधात सोशल मीडियावर कमेंट करणं तरुणाला महागात पडलं आहे. जरांगे समर्थकांनी भर चौकात तरुणाला काळं फासलं आहे.
Published on
Summary

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक

मनोज जरांगे यांच्या विरोधात लक्ष्मण हाके समर्थकही आक्रमक

जरांगेंंच्या विरोधात कमेंट करणं भोवलं

जरांगे समर्थकांनी तरुणाला काळं फासलं

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करणार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली आहे. एकीकडे जरांगे यांच्या भूमिकेला काही नेटकऱ्यांकडून पाठिंबा मिळत आहे. तर दुसरीकडे काही लोकांकडून जरांगे यांच्या मागणीला विरोध होत आहे. मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे यांच्या विरोधात सोशल मीडियावर कमेंट करणे तरुणाला महागात पडलं आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावरही दोन गट पडले आहेत. एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला आव्हान दिलं आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये, अशी आग्रही मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके करताना दिसत आहेत. याच आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांचे समर्थक सोशल मीडियावर एकमेकांना ट्रोलिंग करताना दिसत आहेत.

manoj jarange News
Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

...अन् जरांगे समर्थकांनी तरुणाला काळं फासलं

मनोज जरांगे पाटील हे २७ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे कूच करणार आहेत. याच अनुषंगाने मराठा समाज ठिकठिकाणी मुंबईकडे जाण्यासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळतोय. याचदरम्यान सोशल मीडियावर पैठण येथील एका तरुणाने मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात सोशल मीडियावर कमेंट केल्यामुळे जरांगे समर्थक हे आक्रमक झाले. या समर्थकांनी पैठणच्या बस स्टँड चौकामध्ये या तरुणाला काळ फासलं.

manoj jarange News
Jammu and kashmir : वैष्णो देवी मंदिर यात्रेत मोठी दुर्घटना; ५ भाविकांचा मृत्यू

मनोज जरांगेंना कोर्टाचा झटका

मनोज जरांगे पाटील यांना मुंबई हायकोर्टाने मोठा झटका दिलाय. जरांगेंना आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी हायकोर्टाने नाकारली. कोर्टाने परवानगी नाकारल्याने जरांगे पाटील यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोर्टाच्या निर्णयावर बोलताना जरांगे म्हणाले, 'आम्ही वकील बांधवाशी बोललो आहे. आम्ही आमची बाजू न्यायालयासमोर मांडणार आहोत. न्यायालय आम्हाला परवानगी देईल. आम्ही सगळे नियम आणि अटी पाळून आझाद मैदानावर उपोषण करणार आहोत.

manoj jarange News
ED Raids : राजकारणात खळबळ, आणखी एक बडा नेता ईडीच्या रडारवर; हॉस्पिटल घोटाळ्याचं कनेक्शन उघड?

जरांगेंची पहिली मागणी मान्य

दुसरीकडे सरकारच्या मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली. हैदराबाद गॅझेटियर आणि कुणबी नोंद शोधण्यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीला ६ महिन्यांची मुदतवाढ देण्याची जरांगेंची पहिली मागणी मान्य करण्यात आली आहे.

मराठा आरक्षण उपसमितीच्या निर्णयावर जरांगे म्हणाले, 'ते नेहमी सकारात्मक निर्णय आहे अस म्हणतात. पण उद्या आम्ही सकाळी 10 वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना होणार आहे. आम्हाला अंमलबजावणी पाहिजे. कोतवालच्या हाताने पाठवा, आम्हाला काही अडचण नाही. शिंदे समितीला मुदतवाढ देऊन दोन महिने झाले. विखे पाटलांना जास्त माहिती असेल, समाजापेक्षा नेता मोठा मानू नाही. मराठ्यांनी मराठ्यांवर आरोप करायची ही वेळ नाही. आमची तळतळ काय आहे समजून घ्या'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com