ED Raids : राजकारणात खळबळ, आणखी एक बडा नेता ईडीच्या रडारवर; हॉस्पिटल घोटाळ्याचं कनेक्शन उघड?

ED Raids in Delhi : राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे. आपचा बडा नेता ईडीच्या रडारवर आहे.
ED Raids
ED Raids in Delhi Saam tv
Published On
Summary

राजकारणातील आणखी एक नेता ईडीच्या रडारवर

आप नेते सौरभ भारद्वाज यांच्याशी संबंधित १३ ठिकाणांवर ईडीचे छापे

ईडीकडून कारवाईचा सपाटा

ईडीच्या कारवाईवर आम आदमी पक्षाची टीका

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांच्याशी संबंधित १३ ठिकाणांवर ईडीने छापे मारले. भारद्वाज यांच्या निवासस्थानीही ईडीने छापा टाकला. आप सरकारच्या काळात आरोग्य विभागाशी संबंधित योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला होता. या आरोपाअंतर्गत आप नेते सौरभ भारद्वाज आणि सत्येंद्र जैन यांच्या विरोधात ईडीने जुलैमध्ये गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर ईडीकडून कारवाईचा ससेमिरा सुरु झाला आहे.

सौरभ भारद्वाज यांच्या घरावरील ईडी छाप्यावरून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं की, 'मोदी सरकारकडून यंत्रणाचा दुरुपयोग केल्याचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. मोदी सरकार आम आदमी पक्षाच्या मागे लागलं आहे. मोदी सरकार ज्या प्रकारे 'आप' पक्षाला टार्गेट करतंय. त्याप्रकारे राजकीय इतिहासात कोणत्याही पक्षाच्या मागे लागलं नसेल. आप सातत्याने मोदी सरकारच्या चुकीचे धोरणे आणि भ्रष्ट कामाच्या विरोधात आवाज उचलत आहे, त्यामुळे मोदी सरकार आमचा आवाज दाबू इच्छित आहे. परंतु ते आम्ही होऊ देणार नाही'.

ED Raids
ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये दारूचे सेवन वाढलं; काँग्रेसच्या बड्या नेत्याचं वक्तव्य चर्चेत,VIDEO

काय आहे प्रकरण?

ईडीकडून आपच्या कार्यकाळातील दोन तत्कालीन आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज आणि सत्येंद्र जैन यांचा ५,५९० कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणी तपास सुरु आहे. ईडीच्या माहितीनुसार, २०१८-१९ साली आम आदमी पार्टी सरकारने २४ रुग्णालयांच्या बांधकामांना एका योजनेअंतर्गत मंजुरी दिली होती.

या योजनेच्या माध्यमातून ६ महिन्यात आयसीयू रुग्णालय तयार करण्यात येणार होते. पण त्याचं काम अपूर्ण आहे. यासाठी ८०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. तर आतापर्यंत ५० टक्के काम पूर्ण झालं आहे.

ED Raids
laxman Hake : जरांगेंची चाटायची चाटा, पण आधी राजीनामा द्या; 'पापड्या' म्हणत हाकेंचा राष्ट्रवादीच्या आमदारावर हल्लाबोल,VIDEO

ईडीच्या दाव्यानुसार, तत्कालीन दिल्ली सरकारकडून लोक नायक रुग्णालयाच्या बांधकामासाठी ४८८ कोटी रुपये मंजूर झाले. पुढे तो खर्च वाढवून ११३५ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला. अनेक रुग्णालयांचं बांधकाम सही न घेताच सुरु करण्यात आले. यात ११ ग्रीनफील्ड आणि १३ ब्राउनफील्ड प्रकल्पांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com