Silent Heart Attack Signs saam tv
लाईफस्टाईल

Heart Health: छातीत दुखणं हे हार्ट अटॅकचं लक्षण नाही; प्रमुख लक्षण वेगळंच, नेमकं त्याकडे आपण करतो दुर्लक्ष

Silent Heart Attack Signs: हार्ट अटॅक म्हटलं की, आपल्यासमोर छातीत तीव्र वेदना असं चित्र समोर येतं. अनेकदा हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी तीव्र छातीदुखी हे एकमेव किंवा मुख्य लक्षण नसतं. त्याऐवजी, काही अस्पष्ट आणि सायलेंट (Silent) लक्षणं शरीरात महिनाभर आधीपासून दिसू लागतात.

Surabhi Jayashree Jagdish

  • सततचा थकवा हृदयाचा इशारा असू शकतो

  • विश्रांतीनंतरही थकवा कमी न झाल्यास सावधान

  • ‘सायलेंट हार्ट अटॅक’ लक्षणे हलकी असतात

हृदयविकाराचा झटका म्हणजे छातीत अचानक होणारी तीव्र वेदना किंवा ताण असा सर्वसाधारणपणे लोकांचा समज झालेला आहे. यामध्ये वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संजय भोजराज यांच्या मते, हार्ट अटॅकपूर्वी शरीरात दिसणारा पहिला इशारा आपण सर्वजण फार हलक्यात घेतो. हा इशारा असतो तो म्हणजे सतत जाणवणारा थकवा.

जर तुम्हाला जाणवणारा सततचा थकवा हा पुरेशी झोप, विश्रांती आणि जीवनशैलीत बदल केल्यानंतरही कमी होत नसेल तर ती हृदयाशी संबंधित समस्येचं लक्षणं असू शकतं. हृदय नीट रक्तपुरवठा करू शकत नसेल तर शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे सर्वसाधारण कामांनंतरही तुमचं शरीर तुम्हाला थकलेलं, दमलेलं वाटू लागतं. ही लक्षणं वेळेत न ओळखल्यास शरीराकडून मिळालेला हा महत्त्वाचा ‘इशारा’ दुर्लक्षित होऊ शकतो.

डॉ. भोजराज यांनी सांगितलं की, बहुतांश वेळा लोक सतत जाणवणारा थकवा ताण, वय वाढणं किंवा झोपेचा अभाव अशा कारणांशी जोडतात. पण जर हा थकवा सातत्याने जाणवत असेल आणि पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही कमी होत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.

रक्तपुरवठा कमी होणं, सूज येणं यामुळे शरीराची ऊर्जा साठवण कमी होते. परिणामी व्यक्तीला नेहमीपेक्षा अधिक थकवा जाणवतो. या पद्धतीचा थकवा वेळेत ओळखून तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास हृदयविकाराचा मोठा झटका टाळता येऊ शकतो.

सायलेंट हार्ट अटॅक कसा ओळखावा?

कधी कधी हृदयविकाराचा झटका छातीतील वेदना न होता शांतपणे येतो. यालाच ‘सायलेंट हार्ट अटॅक’ असं म्हणतात. यामध्ये रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे हृदयाच्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यांचं नुकसान होतं. मात्र यात लक्षणे खूप हलकी किंवा दुर्लक्षित करण्यासारखी असू शकतात, जसं की जबड्यात, खांद्यात वेदना, सौम्य थकवा किंवा हलका त्रास.

हृदयविकाराची अनपेक्षित लक्षणं

हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणं बहुतांश वेळा साध्या आजारांसारखी भासतात. डॉक्टरांच्या मते, खालील लक्षणं जर सतत जाणवत असतील तर त्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. सततचा थकवा किंवा अंगदुखी, छाती, हात किंवा पाठीमध्ये हलका त्रास, जबड्यात किंवा खांद्यात अस्वस्थता, पोटात जळजळ किंवा अपचनासारखी भावना, तसंच अगदी नेहमीच्या कामांदरम्यानही श्वास लागणं ही काही महत्त्वाची लक्षणं आहेत.

हृदयविकाराचे पहिले लक्षण काय असते?

सतत जाणवणारा थकवा हे पहिले लक्षण असते.

सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय?

छातीत वेदना नसताना होणारा हृदयविकार झटका.

थकवा हृदयाचा इशारा कसा ओळखावा?

विश्रांतीनंतरही थकवा कमी न झाल्यास ओळखावा.

हृदयविकाराची इतर लक्षणे कोणती?

जबडा, खांदा किंवा पोटात त्रास असतो.

लवकर निदान का गरजेचे आहे?

मोठा हृदयविकार झटका टाळण्यासाठी गरजेचे आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagarparishad And Nagarpanchayat Reservation: तुमचा नगराध्यक्ष कोण होणार? 394 नगरपरिषदा, नगरपंचायतींचं आरक्षण जाहीर, संपूर्ण यादी वाचा

Actress Death Threat: 'मला जीवे मारण्याच्या धमक्या...'; प्रसिद्ध अभित्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार

Crime : पाळीव कुत्र्याला फिरायला घेऊन गेली होती मुलगी, जवानानं बंद कॅन्टिनमध्ये बोलावून केलं भयंकर कृत्य

SIP Calculation: दर महिन्याला ₹६,००० गुंतवा अन् ₹५ लाख मिळवा, SIP कॅल्क्युलेशन एकदम सोप्या भाषेत

Maharashtra Live News Update : नाशिक परिसरातील गोळीबार प्रकरणी माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक

SCROLL FOR NEXT