Long Sitting Risks : तासनतास बसण्याची सवय आरोग्याला ठरु शकते घातक, डॉक्टरांनी दिला सल्ला

Sitting For Too Long: आपल्यापैकी अनेकांना जास्त वेळ खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसून राहण्याची सवय असते. तसेच अनेकांना ऑफिसच्या डेस्कवर बसून बराच वेळ काम करण्याची देखील सवय असते.
Sitting For Too Long
Sitting For Too LongSaam Tv

Sitting Position Side Effects :

आपल्यापैकी अनेकांना जास्त वेळ खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसून राहण्याची सवय असते. तसेच अनेकांना ऑफिसच्या डेस्कवर बसून बराच वेळ काम करण्याची देखील सवय असते.

एकाच जागी तासनतास बसल्याने हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. मद्यपान,धुम्रपान आणि जंक फूड यामुळे आरोग्याच्या (Health) अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे लठ्ठपणा देखील वाढतो.

संशोधनात असे आढळून आले की, तासनतास बसण्याच्या सवयीमुळे कंबर आणि पाठदुखीच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जाणून घेऊया आरोग्यावर कसा परिणाम होतो त्याविषयी

1. रक्ताभिसरण

जास्त वेळ बसल्यामुळे पायांमध्ये रक्ताभिसरण नीट होत नाही. यामुळे रक्तगोठण्याची समस्या होऊ शकते. तसेच रक्तवाहिन्यांना नुकसान होऊ शकते.

Sitting For Too Long
Power Nap Time : तुम्हालाही दुपारी झोपण्याची सवय आहे? जाणून घ्या आरोग्यासाठी किती फायदेशीर?

2. हृदयविकाराचा धोका

जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या असक्रिय असतात. व्यायाम करत नाही त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. इतकेच नाही तर कोलेस्टेरॉल देखील वाढू शकते. त्यामुळे मधुमेहाचा धोका देखील उद्भवू शकतो. तसेच कोलन कॅन्सरचा (Cancer) धोका देखील वाढू शकतो.

3. लठ्ठपणा

संशोधनानुसार, कामामुळे आपण एकाच जागी ८ ते ९ तास बसतो. डेस्क जॉबच्या सवयीमुळे तुम्हाला तासनतास एकाच जागी बसून राहावे लागते. त्यामुळे लठ्ठपणाचा धोका अधिक वाढतो. यासाठी शारीरिक हालचाली करत राहा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com