Prostate Cancer Diet: दीर्घकाळ बसून राहणाऱ्यांना होऊ शकतो प्रोस्टेट कॅन्सर; धोका टाळण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश

Foods to prevent prostate cancer: आधुनिक जीवनशैलीमध्ये कामाच्या स्वरूपामुळे अनेक पुरुषांना एकाच जागी बसून राहावं लागतं. एका ठिकाणी दीर्घकाळ बसून राहण्याने पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचा (Prostate Cancer) धोका वाढू शकतो.
Prostate Cancer Diet: दीर्घकाळ बसून राहणाऱ्यांना होऊ शकतो प्रोस्टेट कॅन्सर; धोका टाळण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश
Published On

प्रोस्टेट ही पुरुषांच्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वाची ग्रंथी आहे. ही ग्रंथी मूत्राशय म्हणजेच ब्लाडरच्या खाली आणि मूत्रमार्गाच्या सभोवती असते. आकाराने ती लहान, गोल आणि अक्रोडासारखी दिसते. प्रोस्टेटचे मुख्य काम म्हणजे शुक्राणूंचं संरक्षण करणं आणि वीर्य पातळ ठेवणे, जे पुरुषांच्या प्रजननक्षमतेसाठी आवश्यक असतं. मात्र आजच्या काळात पुरुषांना सर्वाधिक समस्या याच ग्रंथीशी संबंधित दिसतात.

प्रजनन क्षमतेवर होतो परिणाम

प्रोस्टेटशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या आज पुरुषांमध्ये वाढताना दिसतेय. यामध्ये प्रोस्टेटचा आकार वाढणं, प्रोस्टेटला सूज येणं आणि प्रोस्टेट कॅन्सर यांचा समावेश होतो. या समस्यांमुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर थेट परिणाम होतो. वाढतं वय ही यामागची एक मोठी कारणं असून साधारणपणे साठ वर्षांनंतर या समस्या अधिक प्रमाणात जाणवू लागतात.

Prostate Cancer Diet: दीर्घकाळ बसून राहणाऱ्यांना होऊ शकतो प्रोस्टेट कॅन्सर; धोका टाळण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश
Cancer prevention tips: 3 पैकी १ कॅन्सर टाळता येतो! लाईफस्टाईलमध्ये ५ बदल वाचवू शकतात तुमचा जीव; तज्ज्ञांनी दिल्या टीप्स

याशिवाय दीर्घकाळ बसून राहणं, शरीराला घट्ट आणि अनफिट कपडे घालणं, चुकीचा आहार आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळेही प्रोस्टेटच्या समस्या उद्भवू शकतात.

शतावरी पावडर आणि इतर घरगुती उपाय

हॉर्मोन्समधील बदलांमुळेही प्रोस्टेटमध्ये त्रास निर्माण होऊ शकतो. या समस्या टाळण्यासाठी काही पारंपरिक आणि घरगुती उपाय उपयुक्त ठरतात. शतावरीच्या मुळांपासून तयार केलेली पावडर रात्री झोपण्यापूर्वी दुधात मिसळून घेणं फायदेशीर असते. शतावरीमध्ये सूज कमी करण्याचे गुणधर्म आहेत. त्याचप्रमाणे ती ब्लॅडर म्हणजेच मूत्राशय स्वच्छ ठेवण्यास मदत करते.

Prostate Cancer Diet: दीर्घकाळ बसून राहणाऱ्यांना होऊ शकतो प्रोस्टेट कॅन्सर; धोका टाळण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश
Breast Cancer: ब्रेस्ट कॅन्सरचं निदान होण्यासाठी 'ही' एक टेस्ट वाचवेल तुमचा जीव; कमी वेळेत होतं अचूक निदान

टोमॅटो आणि भोपळ्याच्या बिया

टोमॅटो आणि भोपळ्याच्या बिया यांचं सेवन देखील उपयुक्त आहे. भोपळ्याच्या बियांमध्ये प्रोटीन, मॅग्नेशियम, झिंक, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. जे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात. टोमॅटो आणि पेरू यांच्यामध्ये लायकोपीन नावाचे घटक असतात. लायकोपीन संसर्ग कमी करण्यास मदत करते आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करण्यासही उपयोगी ठरतं.

Prostate Cancer Diet: दीर्घकाळ बसून राहणाऱ्यांना होऊ शकतो प्रोस्टेट कॅन्सर; धोका टाळण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश
Bowel Cancer: पोटदुखी, थकवा की आणखी काही... कॅन्सरची नेमकी लक्षणे कोणती? तज्ज्ञांनी काय सांगितलं?

या पदार्थांचा आहारात समावेश करा

डाळिंबाचा रस प्रोस्टेट पेशींना मजबूत बनवतो. डाळिंबामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वं मुबलक प्रमाणात असतात. जे प्रोस्टेटच्या एकूण आरोग्यासाठी लाभदायक मानले जातात. त्याचप्रमाणे मेथीचं पाणी मूत्रमार्गातील संसर्ग कमी करण्यास मदत करतं. यासाठी मेथीचे दाणे रात्री भिजवून ठेवावेत आणि सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी प्यावं. यामुळे लघवीला योग्य प्रकारे प्रवाह मिळतो आणि ब्लॅडर स्वच्छ राहतो.

Prostate Cancer Diet: दीर्घकाळ बसून राहणाऱ्यांना होऊ शकतो प्रोस्टेट कॅन्सर; धोका टाळण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश
Bile duct cancer: पित्तनलिकेच्या कॅन्सरच्या सुरुवातीला शरीरात होतात 'हे' बदल; वेळीच निदान वाचवेल तुमचा जीव

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com