Chanakya Niti About Parenting  Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti About Parenting : मुलांना चांगले वळण लावण्यासाठी पालकांनी या 10 गोष्टींची काळजी घ्यायला हवीच

कोमल दामुद्रे

Parenting Tips : प्रत्येक आई-वडीलांना असे वाटते की, आपल्या मुलाला चांगले वळण लागावे. त्यामुळे तो स्वत: बरोबरच त्याच्या कुळाचा देखील उद्धार करु शकतो. चांगल्या गोष्टींचे पालन करुन त्याने आयुष्यात यशस्वी व्हावे.

चाणक्य (Chanakya) म्हणतात की, आपल्या मुलांनी आयुष्यात यशस्वी बनवण्यासाठी पालकांनी योग्य दिशा दाखवणे देखील गरजेचे आहे. गुणवान मुले (Child) पालकांचा अभिमान वाढवतात. असे म्हटले जाते की, मातीचे मडक बनवताना त्याला योग्य प्रकारे आकार दिला की, ते मडके अधिक चांगले बनते त्याप्रमाणेच मुलांचे देखील असते. मुलांना योग्य वेळी संस्कार दिला की, ते वेळीच सुधारतात. जाणून घेऊया चाणक्य नीतीमधील १० गोष्टी ज्या मुलांचे भवितव्य घडवतील.

1. सदाचारी :

पालकांनी (Parenting) मुलांमध्ये सद्गुणांचे गुण बिंबवले पाहिजेत. शिक्षणासोबतच ज्या मुलामध्ये सद्गुण असतात, ते इतरांपेक्षा अधिक हुशार असतात.

2. खोटे बोलण्याची सवय नको :

मुलांमध्ये खोटे बोलण्याची सवय कधीही वाढू देऊ नका. मुलांना नेहमी सत्य बोलण्यासाठी प्रेरित करा.

3. शिस्तीचे महत्त्व समजावून सांगा:

जीवन जगण्याची कला शिस्तीतून येते. म्हणूनच मुलांसाठी शिस्त खूप महत्त्वाची आहे. मुलांमध्ये सुरुवातीपासूनच शिस्तीची भावना निर्माण करा. जसे वेळेवर झोपणे, वेळेवर खाणे आणि खेळणे. या सर्व गोष्टी शिस्तीच्या मर्यादेतच कराव्यात.

4. मेहनती बनवा:

मुलांनाही मेहनत करायला प्रवृत्त करा. तसेच जीवनातील मेहनतीचे महत्त्व सांगा. कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते ते स्पष्ट करा.

5. निसर्गाबद्दल सांगा :

जीवन कसे जगायचे यावर निसर्गावर अवलंबून आहे हे मुलांना सांगा. निसर्गाचे रक्षण करण्यासाठी प्रेरणा द्या. निसर्गाने दिलेल्या गोष्टींच्या उपयुक्ततेची माहिती द्या.

6. शिक्षणाचे महत्त्व :

पालकांना मुलांच्या शिक्षणाचे महत्त्व प्रामाणिकपणे सांगितले पाहिजे. शिक्षणाने व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी कशी मदत होते ते स्पष्ट करा. शिक्षणाचे खरे महत्त्व समजावून सांगा.

7. खेळण्यास प्रवृत्त करा :

मुलांसाठी शिक्षणासोबतच खेळही महत्त्वाचा आहे. मुलांना असे खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक विकास होऊ शकतो.

8. महापुरुषांबद्दल सांगा :

मुलांना आदर्श बनवण्यासाठी महापुरुषांबद्दल सांगा. त्यांना महापुरुषांसारखे बनण्याची प्रेरणा द्या.

9. धर्म आणि श्रद्धेची जाणीव करून द्या:

मुलांना धर्म आणि श्रद्धा याविषयी सांगा. त्यांना धार्मिक बनवा. असे केल्याने मुलांमध्ये योग्य-अयोग्याची समज विकसित होईल.

10. आज्ञाधारक बनवा :

पालकांनी नेहमी मुलांसमोर उच्च आचरण सादर केले पाहिजे. तरच मुले आज्ञाधारक होतात. ज्या पालकांची मुले आज्ञाधारक आहेत ते भाग्यवान आहेत, परंतु यासाठी त्यांनी स्वतःला आदर्श पालक म्हणून सादर केले पाहिजे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tip: सतत घाम येतोय? आहारात करा 'हा' छोटा बदल!

Accident News: चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात.. आधी महिलेला धडक, नंतर कार थेट दुकानात , १ गंभीर जखमी

Viral Video: तरुणांना चढला नवरात्रीचा फिवर, ''जय माता दी'' म्हणत दिल्ली मेट्रोमध्ये गायलं गाणं; व्हायरल VIDEO ची जोरदार चर्चा

Akola News : संतापजनक! निर्दयी बापाने 2 चिमुकल्या मुलींना नदीत फेकलं; मन सुन्न करणारी घटना, आरोपीला अटक

Lakshmi Narayan Rajyog: ४ दिवसांनी तूळ राशी बनणार लक्ष्मी नारायण योग; 'या' राशींच्या संपत्तीत होणार वाढ

SCROLL FOR NEXT