Chanakya Niti On Women : पुरुषांनो, या स्वभावाच्या स्त्रिया करतात घराचा नाश; वेळीच व्हा सावध

Women's Nature : सद्गुणी स्त्रीमुळे घराला घरपण येते. घर हे स्वर्गासारखे होते.
Chanakya Niti On Women
Chanakya Niti On WomenSaam tv
Published On

Relationship Tips : असे म्हटले जाते की, स्त्री ही घराचा आरसा असते. यासोबतच तिला तिला घराचे सौंदर्य ही मानले जाते. सद्गुणी स्त्रीमुळे घराला घरपण येते. घर हे स्वर्गासारखे होते. चाणक्य म्हणतात की, सद्गुणी स्त्री कुटुंबाचा अभिमान वाढवते.

स्त्री आणि पुरुष (Men) यांना सध्याच्या जगात एकसमानतेने पाहिले जाते. शास्त्रात महिलांना पूजनीय मानले गेले आहे. स्त्रीला शक्ती आणि देवीचे प्रतीक मानले जाते. चाणक्य म्हणतात की, अशा स्त्रियांपासून अंतर ठेवावे, ज्यांच्याकडे अहंकार, अज्ञान, लोभ असे दोष आहेत. चाणक्याच्या मते, हे दोष असलेली स्त्री (Women) स्वत:चाही नाश करते, तर तिच्या जवळचे लोकही त्यांचा नाश करतात.

Chanakya Niti On Women
Girls Attract On Boys First Date : पहिल्या भेटीत मुली मुलांमधल्या या गोष्टी करतात नोटीस...

1. अहंकार

स्त्रीने अहंकार टाळावा. स्त्रीला कशाचाही अभिमान नसावा. चाणक्याने म्हटले आहे की, गर्विष्ठपणा महिलांसाठी अत्यंत घातक आहे. चाणक्य नुसार जेव्हा स्त्रीमध्ये गर्व येतो तेव्हा लक्ष्मी आणि माता सरस्वती तिच्यावर कोपतात. घरातून सुख-समृद्धी हळूहळू नष्ट होऊ लागते.

2. अज्ञान

चाणक्याच्या मते स्त्रीने ज्ञानी असले पाहिजे. समाजाच्या जडणघडणीत महिलांची भूमिका सर्वात महत्त्वाची मानली गेली आहे. सुशिक्षित आणि ज्ञानाने परिपूर्ण असलेल्या महिलाच या समाजाला नवी दिशा देतात. कारण ते या गुणाने घराला स्वर्ग बनवतात. समाज घडवण्याचा मार्ग घरातूनच तयार होतो.

Chanakya Niti On Women
Women Physical Hygiene : शरीर संबंधांनंतर महिलांनी स्वच्छतेची काळजी कशी घ्यावी ? इन्फेक्शन पासून राहाल दूर...

3. लोभ

चाणक्याने स्त्रियांना हा दोष टाळण्यास सांगितले आहे. जेव्हा स्त्रीमध्ये लोभ निर्माण होतो तेव्हा ती घरातील सुख-शांती नष्ट करू लागते. घरातील सदस्यांचे जीवन तणावाने (Stress) भरलेले असते. तणावामुळे माणसाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ लागतो आणि एक दिवस असा येतो की सर्व काही नष्ट होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com