Central Government Advisory Saam Tv
लाईफस्टाईल

Central Government Advisory: चीनमध्ये रहस्यमय आजाराने हाहाकार, भारतात अलर्ट; केंद्र सरकारकडून राज्यांना सूचना जारी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Central Government New Guideline For China New Disease :

चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून श्वसनाच्या आणि तापाच्या समस्या वाढताना दिसत आहे. या तापाचा परिणाम लहान मुलांवर मोठ्या प्रमाणात होत आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सकार आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्केसाठी निर्देश जारी केले आहेत.

गेल्या काही दिवसात चीनमध्ये ताप आणि श्वसनाच्या समस्या असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. हा आजाराच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने काळजी घेण्यास सांगितले आहे.

केंद्र सरकारने दिलेले निर्देश

उत्तर चीनमधील मुलांमध्ये श्वसनाच्या आजारात वाढ झाली आहे. या गोष्टीचा अहवाल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे सावधगिरी म्हणून श्वसनविकारांविरुद्धच्या उपाययोजनांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सुरू असलेली इन्फ्लूएन्झाची साथ आणि हिवाळ्याच्या ऋतूमुळे, श्वसनविकाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. भारत सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. मात्र, कोणतीही भीती बाळगण्याची गरज नसल्याचेही सरकारने सांगितले आहे.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात, सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालय सज्जतेबाबतच्या उपाययोजनांचा ताबडतोब आढावा घेण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये, मनुष्यबळाची उपलब्धता, रुग्णालयातील बेड्स, इन्फ्लूएंझासाठी औषधे आणि लस, वैद्यकीय ऑक्सिजन, वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे, चाचणी संच आणि विविध वैद्यकीय उपचारात्मक रसायने आणि व्हेंटिलेटर्स, या सर्व बाबींची मोठ्या प्रमाणात उपलब्धता यांचा समावेश आहे.

सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना ‘कोविड-19 च्या अनुषंगाने, परिस्थितीवर लक्ष ठेवण्याबाबत या वर्षाच्या सुरुवातीलाच देण्यात आलेली सुधारित देखरेख धोरणांसाठीची मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याचा सल्ला आहे. या संसर्गांच्या वाढीवर, एकात्मिक रोग देखरेख प्रकल्पांचे (IDSP), जिल्हा आणि राज्य विभाग, बारकाईने लक्ष ठेवून आहेत की नाही याची खातरजमा करण्याची सूचनाही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आली आहे. यात लहान मुले आणि नवजात अर्भके यांची विशेष काळजी घेण्याचा समावेश आहे.

SARI ग्रस्त रूग्णांच्या (विशेषत: लहान मुले आणि किशोरवयीन मुले) नाक आणि घशातील स्त्रावांचे नमुने श्वसन विकार चाचणीसाठी, राज्यांमध्ये असलेल्या व्हायरस रिसर्च अँड डायग्नोस्टिक लॅबोरेटरीज या प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यास राज्यांना सांगितले आहे. या सावधगिरीच्या आणि उपायांच्या अंमलबजावणीचा एकत्रित परिणाम कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी अपेक्षित आहे.

अलीकडेच, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या उत्तरेकडील भागात श्वसनविकाराच्या आजारात वाढ झाल्याचे संकेत दिले आहेत. संघटनेने चिनी अधिकार्‍यांकडून अतिरिक्त माहिती मागितली आहे. सध्या तरी कुठल्याही प्रकारच्या धोक्याच्या इशाऱ्याची गरज नाही असे अनुमान काढले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT