राज्यात अनेक भागात आज सकाळी पावसाने हजेरी लावली. ठाणे आणि पालघर परिसरात जोरदार पाऊस झाला. मात्र यामुळे वाहतुकीत कोणताही अडथळा निर्माण झाला नाही.
एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे ठाणे आणि पालघरमधील अनेक भागात विजांचा कडकडाट झाला. यातच वीज पडून ठाण्यात एका इमारतीला आग लागली. तर दुसरीकडे पालघरमध्ये एका रस्ता अपघातात एका व्यक्ती मृत्यू झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मुंबईत रविवारी सकाळी मेघगर्जनेसह हलका पाऊस झाला. त्यामुळे शहरातील वातावरण थंड झाले आहे. पावसामुळे रस्ते वाहतूक किंवा लोकल ट्रेन सेवेत कोणताही अडथळा आला नाही. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबई परिसरात गेल्या २४ तासांत ९.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सांताक्रूझ येथे गेल्या २४ तासांत ५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. (Latest Marathi News)
रविवारी पहाटे ठाणे आणि शेजारच्या पालघर जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील एका इमारतीला रविवारी सकाळी वीज पडल्याने आग लागली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी साहिब खरबे यांनी सांगितले की, ठाणे येथील भिवंडी शहरातील काल्हेर भागातील दुर्गेश पार्क परिसरात असलेल्या इमारतीच्या प्लास्टिकच्या छताला सकाळी 6.45 च्या सुमारास आग लागली.
या घटनेत कोणीही जखमी झाले नसून इमारतीच्या प्लॅस्टिकच्या छताचे आगीत नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. माहिती मिळाल्यानंतर, अग्निशमन दल घटनास्थळी पाठवण्यात आले आणि आग आटोक्यात आणण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.