Pm Modi Security Lapse : PM मोदींच्या सुरक्षेत चूक! पोलीस अधीक्षकांसह २ डीएसपी, ४ इन्स्पेक्टर निलंबित; सरकारची मोठी कारवाई

Pm Modi News : गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या सुरक्षेचे मोठी चूक झाली होती. याप्रकरणी एकूण सात पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
Pm Modi Security Lapse
Pm Modi Security LapseSaam Tv
Published On

Pm Modi Security Lapse :

गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या सुरक्षेचे मोठी चूक झाली होती. याप्रकरणी एकूण सात पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये फिरोजपूर जिल्ह्याचे तत्कालीन पोलिस अधीक्षक आणि दोन डीएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

गेल्या वर्षी 5 जानेवारीला सुरक्षा भंगाची घटना घडली होती. विधानसभा निवडणुकीच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी पंजाबला गेले होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pm Modi Security Lapse
Mahayuti Seat Sharing : महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कोण किती जागांवर लढवणार लोकसभा निवडणूक? फडणवीसांनी सांगितला आकडा...

पंतप्रधान मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांनी आंदोलकांनी केलेल्या नाकेबंदीमुळे पंतप्रधानांचा ताफा सुमारे 20 मिनिटे उड्डाणपुलावर अडकून पडला होता. यावरून भाजप नेत्यांनी तत्कालीन चरणजीत सिंह चन्नी सरकारवर निशाणा साधला होता. त्याचवेळी पंतप्रधानांच्या प्रवास योजनेत शेवटच्या क्षणी बदल करण्यात आल्याचे काँग्रेसने म्हटले होते. (Latest Marathi News)

सुरक्षा भंगाची चौकशी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने सुरक्षा भंगासाठी पंजाब सरकारच्या अनेक अधिकाऱ्यांना जबाबदार धरले होते. भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सध्याच्या आम आदमी पक्षाच्या सरकारने आता या त्रुटीबद्दल सात पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

Pm Modi Security Lapse
15 YRS Of 26/11 Mumbai Attack : फायरिंग आणि स्फोटांच्या आवाजाने हादरली होती मुंबई; ३ दिवस सुरु होता मृत्यूतांडव

याबाबतच्या आदेशात म्हटले आहे की, सर्व सात पोलिसांना पंजाब नागरी सेवा (शिक्षा आणि अपील) नियम, 1970 च्या नियम 8 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या नियमांतर्गत शिक्षा पदोन्नती रोखण्यापासून ते सेवेतून बडतर्फ करण्यापर्यंत असू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com