15 YRS Of 26/11 Mumbai Attack : फायरिंग आणि स्फोटांच्या आवाजाने हादरली होती मुंबई; ३ दिवस सुरु होता मृत्यूतांडव

26/11 Mumbai Attack : फायरिंग आणि स्फोटांच्या आवाजाने हादरली होती मुंबई; ३ दिवस सुरु होता मृत्यूतांडव
15 YRS Of 26/11 Mumbai Attack
15 YRS Of 26/11 Mumbai AttackSaam Tv
Published On

15 YRS Of 26/11 Mumbai Attack :

कधी न थांबणारं शहर अशी ओळख असलेली मुंबई आजच्याच दिवशी फायरिंग आणि स्फोटांच्या आवाजाने हादरली होती. आजच्याच दिवशी 15 वर्षांपूर्वी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईचा वेग अचानक थांबला होता. तीन दिवस शहरात अक्षरश: मृत्यूतांडव सुरु होता.

समुद्रमार्गे 10 दहशतवादी मुंबईत पोहोचले होते आणि त्यांनी ताज हॉटेलसह इतर अनेक ठिकाणी गोळीबार करण्यास सुरुवात केली होती. या हल्ल्यात 18 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 300 हून अधिक लोक जखमी झाले होते. देशातील सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक असलेल्या ताज हॉटेलला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. दहशतवाद्यांशी तीन दिवस चाललेल्या चकमकीनंतर अजमल आमीर कसाब नावाच्या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

15 YRS Of 26/11 Mumbai Attack
Who is Rushikesh Bedre : अंतरवाली सराटीत झालेल्या दगडफेकीतील प्रमुख आरोपी ऋषिकेश बेदरे नेमका आहे तरी कोण?

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा समावेश देशातीलच नाही तर जगभरातील मोठ्या दहशतवादी घटनांमध्ये होतो. सर्व 10 दहशतवादी पाकिस्तानातील कराची येथून बोटीने मुंबईत आले होते. भारतीय नौदलाला फसवण्यासाठी त्यांनी एका भारतीय नौकेचे अपहरण केले आणि त्यातील सर्व लोकांना ठार केले. या बोटीतून ते रात्री आठच्या सुमारास कुलाब्याजवळील मासळी मार्केटमध्ये उतरले आणि त्यानंतर ते मुंबईच्या विविध भागात गेले. (Latest Marathi News)

या ठिकाणांना दहशतवाद्यांनी केले होते लक्ष्य

त्या रात्री दहशतवाद्यांनी मुंबईतील अनेक प्रसिद्ध ठिकाणांना लक्ष्य केले. मुंबईतील ताज हॉटेल, ओबेरॉय ट्रायडंट हॉटेल आणि नरिमन हाऊस यांना लक्ष्य करण्यात आले. याशिवाय रात्री 9.30 वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनल रेल्वे स्थानकावर 4 दहशतवाद्यांनी AK-47 ने लोकांवर गोळीबार सुरू केला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले होते, मात्र तोपर्यंत विलेपार्लेमध्येही गोळीबार सुरू झाला होता. या दहशतवादी हल्ल्याने तीन दिवस मुंबईत मोठा रक्तपात केला होता.

15 YRS Of 26/11 Mumbai Attack
India Canada News : तपास पूर्ण न करताच केले आरोप, निज्जर प्रकरणी भारतीय राजदूतांनी कॅनडाची काढली खरडपट्टी

एनएसजी कमांडोंनी मुंबईला दहशतवाद्यांपासून केलं मुक्त

मुंबईला दहशतवाद्यांपासून मुक्त करण्यासाठी पोलीस आणि लष्कराने कारवाई सुरू केली होती. तीन दिवस चाललेल्या या कारवाईत लष्कर आणि पोलिसांच्या तुकड्यांसोबत एनएसजी कमांडोचाही सहभाग होता. तीन दिवस चाललेल्या चकमकीत सर्व दहशतवादी मारले गेले आणि एक अजमल आमिर कसाब जिवंत पकडला गेला. कसाबला 2012 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. थरकाप उडवणाऱ्या या घटनेला आज 15 वर्ष पूर्ण झाले आहेत. मुंबईकर आजही ते तीन दिवस विसरलेले नाहीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com