Submarine Accident: पाणबुडीच्या भीषण दुर्घटनेत ५५ चिनी सैनिकांचा मृत्यू; पिवळ्या समुद्रात चीनच्या शेनडोंग प्रांतात घडली दुर्घटना

Submarine Accident News: पिवळ्या समुद्रात पाणबुडीच्या भीषण दुर्घटनेत चिनी सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
Submarine Accident In China
Submarine Accident In ChinaSaam Tv
Published On

Submarine Accident In China

पिवळ्या समुद्रात पाणबुडीच्या भीषण दुर्घटनेत किमान ५५ चिनी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या शेनडोंग प्रांतानजीक ही घटना घडली असून अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.

यूकेच्या एका रिपोर्ट्सनुसार, पाणबुडीच्या ऑक्सिजन यंत्रणेत अचानक बिघाड झाली आणि विषबाधा होऊन या क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. ज्यात चिनी पीएलए नेव्हीच्या कॅप्टनचाही समावेश आहे. पाणबुडीत कर्नल झ्यू योंग यांच्यासह 21 अधिकारी होते. डेली मेलने यूकेच्या गुप्त वृत्ताचा हवाला देत वृत्त दिले आहे.

Submarine Accident In China
Sikkim News: सिक्किममध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस, महापुरात लष्कराचे 23 जवान गेले वाहून; थरारक VIDEO

या अहवालानुसार 21 ऑगस्ट रोजी, पाणबुडी पिवळ्या समुद्रात मोहिमेवर असताना हा अपघात झाला. ही घटना स्थानिक वेळेनुसार 08:12 वाजता घडली होती. या पाणबुडीत 22 अधिकारी, 7 कॅडेट अधिकारी, 9 कनिष्ठ अधिकारी आणि 17 सैनिक होते. या सर्वांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

चीनने मात्र, अशाप्रकारची कोणतीही घटना घडली नसून या घटनेबाबतची माहिती पूर्णपणे खोटी असल्याचं म्हटलं आहे.

Submarine Accident In China
Malaria Vaccine : मलेरियाच्या दुसऱ्या लसीला WHOची मान्यता; पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटवर असणार मोठी जबाबदारी

यूके अहवाल जगभरातील संरक्षण क्षेत्रातील गुप्त माहितीवर आधारित असतो आणि याच अहवालातील तपशील तपासण्यासाठी डेली मेलने रॉयल नेव्हीशी संपर्क साधला, परंतु अधिकृत स्त्रोतांनी याबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला.

डेली मेलच्या वृत्तानुसार, गेल्या 15 वर्षांपासून चिनी टाईप 093 पाणबुड्या कार्यरत आहेत, 351 फूट लांबीच्या या जहाजांवर टॉर्पेडो आहेत. टाईप 093 पाणबुड्या चीनच्या नौदलाचे प्रतिनिधित्व करतात आणि त्या कमी आवाजाच्या उत्सर्जनासाठी ओळखल्या जातात.

Submarine Accident In China
Indian Railways: भारतातील 'या' रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी लागतो पासपोर्ट आणि व्हिसा, जाणून घ्या का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com