Malaria Vaccine : मलेरियाच्या दुसऱ्या लसीला WHOची मान्यता; पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटवर असणार मोठी जबाबदारी

R21/Matrix-M : लसीच्या एका डोसची किंमत 160 ते 330 रुपये असणार आहे.
Malaria Vaccine
Malaria VaccineSaam TV
Published On

Malaria Vaccine :

मलेरियाच्या दुसऱ्या लसीला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मान्यता दिली आहे. R21/Matrix-M या लसीला डब्लूएचओने मंजुरी दिली आहे. पुढील वर्षापासून ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे. या लसीच्या एका डोसची किंमत 160 ते 330 रुपये असणार आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठानेही लस बनवली आहे. जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियावर या लसीच्या निर्मितीची जबाबदारी असणार आहे. सीरम इन्स्टिट्युटसोबत दरवर्षी 10 कोटी डोस तयार करण्यासाठी करार करण्यात आला आहे.

मलेरियावरील ही लस 75 टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे. जर एखाद्या व्यक्तीला मलेरिया असेल तर त्याला या लसीचे 4 डोस घ्यावे लागतील. सीरम इन्स्टिट्युटने दिलेल्या माहितीनुसार, ही लस चार देशांतील चाचणीदरम्यान अत्यंत प्रभावी ठरली आहे. ही लस विशेषतः मलेरियाच्या गंभीर प्रकारांपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com