कॅन्सरविरोधी नव्या लसी या निरोगी व्यक्तींना रोग होऊ नये म्हणून नाहीत तर ज्या रुग्णांचा कॅन्सरवर उपचार झालेला आहे, त्यांच्यात तो पुन्हा होऊ नये यासाठी विकसित केल्या जात आहेत, असं वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.
केरळ स्टेट आयएमएच्या संशोधन विभागाचे संयोजक आणि आयएमए कोचीच्या वैज्ञानिक समितीचे अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन यांनी सांगितलं की, “या उपचारात्मक कॅन्सर लसी (थेरप्यूटिक कॅन्सर व्हॅक्सिन्स) आहेत. त्यांचा उद्देश म्हणजे उपचारानंतर रोगाची पुनरावृत्ती रोखणं हा आहे. निरोगी लोकांमध्ये कॅन्सर होऊ नये यासाठी या लसींचा वापर होत नाही.”
शनिवारी गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ऑन्कोलॉजी सोसायटीच्या (GIOS) दुसऱ्या वार्षिक परिषदेत बोलत होते.
डॉ. जयदेवन म्हणाले की, उपचारपद्धतीत सतत बदल होत असून लसीकरण हे आता इम्युनोथेरपीच्या स्वरूपात उपलब्ध झालं आहे. या लसींमध्ये ‘निओॲन्टिजेन थेरपी’ वापरली जाते. यात शरीराची स्वतःची रोगप्रतिकारशक्ती एक्टिव्ह होऊन कॅन्सरच्या पेशींना ओळखते आणि नष्ट करते.
तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत कोलोरेक्टल कॅन्सर (CRC) या आजारावर विशेष भर देण्यात आला आहे. हा आजार जागतिक पातळीवर झपाट्याने वाढतो आहे, असं आयोजकांनी सांगितलं.
या परिषदेचे संयोजक सचिव डॉ. अरुण आर. वारियर म्हणाले, “कॅन्सरवरील उपचार झपाट्याने बदलत आहेत. आता प्रत्येक रुग्णासाठी त्याच्या स्थितीनुसार वैयक्तिक उपचार करणं आवश्यक ठरत आहे.”
या परिषदेकरिता २०० हून अधिक कॅन्सरतज्ज्ञ, पचनतज्ज्ञ आणि इतर वैद्यकीय तज्ज्ञ एकत्र आले आहेत. ते कॅन्सर प्रतिबंध, तपासणी आणि पचारपद्धतीतील नव्या घडामोडींवर चर्चा करत आहेत.
या कार्यक्रमात शस्त्रक्रिया, किरणोपचार आणि जनुकशास्त्र या विषयांवर कार्यशाळा घेण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे शस्त्रक्रियेशिवाय उपचारपद्धतींवर विशेष सत्र आयोजित करण्यात आले असून यात देश-विदेशातील ख्यातनाम तज्ज्ञ सहभागी होत आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.