Headache: डोकेदुखीचा वारंवार त्रास का होतो? जाणून घ्या त्यामागील मुख्य कारणे, अन्यथा...

Headache Relief: वारंवार डोकेदुखी होणे शरीरातील काही महत्त्वाच्या जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या कमतरतेमुळे किंवा अंतर्निहित आजारामुळे होऊ शकते. कोणते पोषक घटक कमी आहेत ते जाणून घ्या.
Headache: डोकेदुखीचा वारंवार त्रास का होतो? जाणून घ्या त्यामागील मुख्य कारणे, अन्यथा...
Published On

डोकेदुखी ही सामान्य समस्या असून कोणालाही होऊ शकते. तणाव, झोपेची कमतरता, पाण्याचा अभाव किंवा उन्हात जास्त वेळ घालवणे यामुळे डोकेदुखी होऊ शकते. घरगुती उपाय, चांगली झोप आणि औषधे याने ती कमी होऊ शकते. मात्र, वारंवार डोकेदुखी झाल्यास गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे कारण ती जीवनसत्त्वे व खनिजांच्या कमतरतेमुळे किंवा अंतर्निहित आजारामुळे होऊ शकते.

जीवनसत्त्वे ही शरीरासाठी अत्यंत आवश्यक नैसर्गिक संयुगे आहेत, जी आपल्याला मुख्यत्वे आहारातून मिळतात. सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डीसारखे पोषक घटकही मिळतात. संशोधनानुसार, काही जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी, मायग्रेन आणि थकवा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे, या जीवनसत्त्वांच्या योग्य प्रमाणाबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊया, कोणत्या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे वारंवार डोकेदुखी होऊ शकते.

Headache: डोकेदुखीचा वारंवार त्रास का होतो? जाणून घ्या त्यामागील मुख्य कारणे, अन्यथा...
AC Health Risks: ८-१० तास AC मध्ये राहता? जाणून घ्या कोणते धोके संभवतात

वारंवार डोकेदुखी होण्याचे कारण होमोसिस्टीन नावाच्या अमिनो आम्लाची वाढलेली पातळी असू शकते, जी शरीरात नैसर्गिकरित्या तयार होते. व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे होमोसिस्टीन वाढू शकते. विशेषतः, व्हिटॅमिन बी१२ची कमतरता मज्जासंस्थेवर परिणाम करून थकवा, मुंग्या येणे आणि डोकेदुखी यांसारख्या समस्यांना जन्म देते. त्यामुळे योग्य जीवनसत्त्वांची पूर्तता आवश्यक आहे.

Headache: डोकेदुखीचा वारंवार त्रास का होतो? जाणून घ्या त्यामागील मुख्य कारणे, अन्यथा...
Headche: तुम्हाला माहित आहे का डोकेदुखीचे वेगवेगळे प्रकार? जाणून घ्या आजाराचा संकेत मिळतो?

वारंवार डोकेदुखी होण्याचे कारण होमोसिस्टीन नावाच्या अमिनो आम्लाची वाढलेली पातळी असू शकते, जी शरीरात नैसर्गिकरित्या तयार होते. व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे होमोसिस्टीन वाढू शकते. विशेषतः, व्हिटॅमिन बी१२ची कमतरता मज्जासंस्थेवर परिणाम करून थकवा, मुंग्या येणे आणि डोकेदुखी यांसारख्या समस्यांना जन्म देते. त्यामुळे योग्य जीवनसत्त्वांची पूर्तता आवश्यक आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com