Childhood skin diseases: लहान मुलांमध्ये वाढतेय त्वचेची 'ही' समस्या; काय आहेत याची कारणं जाणून घ्या

Skin problems in children: आजकाल लहान मुलांमध्ये अनेक आरोग्य समस्या वाढत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे त्वचेशी संबंधित आजार. गेल्या काही वर्षांपासून लहान मुलांमध्ये त्वचारोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
Childhood skin diseases
Childhood skin diseasessaam tv
Published On

एक्झिमा हा त्वचेचा एक प्रकारचा दुर्मिळ स्थिती आहे. या आजारात त्वचेला खूप खाज सुटते आणि जळजळ जाणवते. एक्झिमामुळे तुमची त्वचा कोरडी पडते, खाज सुटते आणि खडबडीत होते. ही समस्या हात, पाय, मान, कानाभोवती, ओठ आणि चेहऱ्यावर दिसू शकते. लहान मुलांच्या त्वचेवर रॅश येणं आणि त्वचा लाल होणं अशा समस्या सर्रासपणे पाहायला मिळतात. ही एक्झिमाची लक्षण असतं. एक्झिमाची कारणं, लक्षणं आणि व्यवस्थापन समजून घेतल्यास पालकांना आपल्या मुलाची योग्य काळजी घेण्यास मदत होऊ शकते.

मुंबईतील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. शरीफा चौसे यांनी सांगितलं की, मुलांमध्ये हाताचा एक्झिमा ही एक त्वचेची एक स्थिती आहे जिथे मुलांच्या हातांची त्वचा कोरडी पडते, खाज सुटत आणि त्वचा लाल होते आणि कधीकधी त्वचेवर भेगा पडतात. ही स्थिती मुलाच्या झोपेवर आणि आत्मविश्वासावर देखील परिणाम करतात.

डॉ. चौसे पुढे म्हणाल्या की, हातांवरील सततचा कोरडेपणा मुलांमधील तणाव, चिंतेस कारणीभूत ठरतात. पालकांना अनेकदा हे त्वचेचा सामान्य कोरडेपणा किंवा ऍलर्जी वाटू शकते, परंतु हाताच्या एक्झिमाला वेळीच उपचारांची आवश्यकता असते. पालकांनी याची लक्षणं आणि उपचार जाणून घेतल्यास मुलांना यापासून होणारा त्रास कमी करता येतो.

Childhood skin diseases
Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

याची कारणं काय आहेत?

ही एक अनुवांशिक स्थिती असू शकते. म्हणून एक्झिमा, दमा किंवा ऍलर्जीचा कुटुंबातील इतिहास असलेल्या मुलांना याचा जास्त धोका असतो. साबण, डिटर्जंट आणि सॅनिटायझर्सचा अतिवापर हे देखील त्वचेतील नैसर्गिक तेलग्रंथी नष्ट करते. वारंवार हात धुतल्यामुळे एक्झिमा होऊ शकतो आणि धूळ, परागकण, पाळीव प्राण्यांचे केस किंवा काही ठराविक पदार्थांमुळे ऍलर्जी होऊन त्वचेला त्रास होऊ शकतो.

थंड हवामान आणि कोरडी हवा ही एक्झिमासारखी स्थिती आणखी तीव्र करते. शारीरीक स्वच्छतेसंबंधीत उत्पादनं, परफ्यूम किंवा अगदी खडू आणि रंगांमधील रसायनं देखील संवेदनशील त्वचेला त्रासदायक ठरु शकतात. पालकांनी या कारणांकडे विशेष लक्षात दिले पाहिजे आणि विलंब न करता वेळीच उपचार करावे.

Childhood skin diseases
Heart Attack Signs: चेहऱ्यावर 'ही' लक्षणं दिसली तर समजा की हार्ट अटॅक येणारे; वेळीच डॉक्टरांची घ्या मदत

या लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष

  • हातांवर लाल चट्टे आणि सूज

  • सतत खाज सुटणे, विशेषतः रात्रीच्या वेळीच खुप खाज येणे

  • कोरडी, खपलीयुक्त आणि खडबडीत त्वचा

  • रक्तस्त्राव होऊ शकणारे किंवा वेदनादायक असे पुरळ

  • गंभीर प्रकरणांमध्ये द्रवाने भरलेले फोड

Childhood skin diseases
Hair Loss: अचानक केस गळती सुरु झालीये? सावध व्हा, हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं; पाहा तज्ज्ञांनी काय सांगितलं

योग्य वेळी उपचार न केल्यास एक्झिमामुळे त्वचेवर भेगा पडणं, वेदना होणं आणि लिहिताना, खेळताना किंवा एखादी वस्तू धरण्यात अडचण येणं, तणाव येणं, लाजिरवाणं वाटणं किंवा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. शिवाय लहान मुलांमधील हा एक्झिमा भविष्यात प्रौढावस्थेतही टिकून राहतो. म्हणून, पालकांनी त्यांच्या मुलांबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे.

Childhood skin diseases
Drinking Water : उभं राहून पाणी प्यायल्याने खरंच गुडघ्यांच्या समस्या उद्भवतात? तज्ज्ञांनी सांगितलं सत्य

या टिप्सचे पालन करा

हात धुतल्यानंतर मुलांकरिता सुगंध विरहीत, सौम्य क्रीम वापरण्याचा सल्ला देतात. त्यांना तीव्र रसायनांचा समावेश असलेला साबण किंवा सॅनिटायझर्सचा वापर मर्यादित करावा लागतो. लक्षणं अधिक तीव्र करणारे पदार्थ, रसायने किंवा हवामानातील बदलांचा मागोवा घ्या आणि डॉक्टरांशी चर्चा करा.

Childhood skin diseases
Health facts: उभं राहून पाणी प्यायल्याने खरंच गुडघेदुखीचा त्रास होतो? वैज्ञानिक दृष्टिकोनातून सत्य काय, वाचा!

कोरडेपणा आणि खाज टाळण्यासाठी थंड हवामानात हातमोजे वापरा. एक्झिमासाठी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. मुलांमध्ये हातांचा एक्झिमाची समस्या ही एक छोटीशी त्वचेची समस्या वाटू शकते, परंतु जर दुर्लक्ष केले तर ते दैनंदिन जीवनावर आणि दीर्घकालीन त्वचेच्या आरोग्यावर परिणाम करू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com