आपल्या शरीराला पाण्याची गरज असते. शरीरात पाण्याची कमतरता होऊ द्यायची नाही, असं म्हटलं जातं. आपल्या शरीरासाठी पाणी खूप महत्त्वाचं असतं. पाणी हे आपल्या शरीरातील एक मूलभूत गरजांपैकी एक आहे. जर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली तर तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं.
डॉक्टर देखील आपल्याला भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. मात्र यावेळी नेहमी बसून पाणी प्यावं असंही डॉक्टर सांगतात. अनेक वेळा तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना असं म्हणताना ऐकलं असेल की, उभं राहून पाणी पिऊ नये. असं पाणी प्यायल्यास ते थेट तुमच्या गुडघ्यापर्यंत जाऊ शकते ज्यामुळे तुम्ही संधिवाताचा त्रास होऊ शकतो. पण हे खरं आहे का?
माहिमच्या एस.एल रहेजा रूग्णालयातील Internal Medicine कंसल्टंट डॉ. डॉ निखिल कुलकर्णी यांनी सांगितलं की, पाणी आपल्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे. याचं कारण म्हणजे त्यामुळे शरीराचं तापमान नियंत्रित करण्यास मदत होते. याशिवाय पेशींना आवश्यक पोषक मिळतात आणि शरीराला कचरा बाहेर काढण्यास मदत करते. एखाद्याने किती पाणी प्यावे हे हवामानाच्या परिस्थितीवर आणि त्यांच्या क्रियाकलापांच्या पातळीवर अवलंबून असतं.
डॉ. कुलकर्णी पुढे म्हणाले की, एक जुनी गोष्ट आहे जी चुकीचं सांगते की, एखाद्याने उभं असताना पाणी पिऊ नये. कारण त्यामुळे संधिवाताचा त्रास होतो. मुळात या दाव्याचं समर्थन करण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. संधिवात प्रामुख्याने आपण ज्या स्थितीत पाणी पितात त्याऐवजी आनुवंशिकता, वय आणि सांधेदुखीच्या दुखापतींसारख्या कारणांमुळे होतो. पाणी संपूर्ण शरीरात फिरते आणि त्यामुळे त्याला कोणतीही हानी होत नाही.
लोकांमध्ये असा गैरसमज आहे की, जर एखाद्या व्यक्तीने उभं राहून पाणी प्यायल्यास ते गुडघ्यामध्ये जाऊ शततं. आहारतज्ज्ञांच्या मते, पाणी प्यायल्यानंतर ते अन्ननलिकेमध्ये जाऊन आणि नंतर पोटात जातं. शरीरात असा वेगळा मार्ग नाही की ज्याद्वारे पाणी थेट गुडघ्यापर्यंत जाईल आणि तुम्हाला संधिवाताचा त्रास होईल.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्रौढांनी दररोज 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायलं पाहिजे. साडेतीन लिटरपेक्षा जास्त पाणी पिणं शरीरासाठी योग्य नाही. जर कोणी खेळाडू किंवा एथलीट असेल तर त्यांच्या बाबतीत पिण्याच्या पाण्याचे निकष वेगळे असू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.