Budh Gochar 2023 Saam tv
लाईफस्टाईल

Budh Gochar 2023 : बुध गोचरमुळे जुळून येतोय गजकेसरी योग ! या 6 राशीचे खुलणार भाग्य, नोकरीत बढतीची शक्यता

Mercury Transit In Taurus : गुरु व चंद्र हा मकर राशीत असल्यामुळे गजकेसरीसारखा राजयोग तयार झाला आहे.

कोमल दामुद्रे

Budh Gochar Gajkesari Yog : ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला राजा म्हटले जाते. आज ७ जूनला बुध ग्रह हा मेष राशीतून वृषभ राशीत संक्रमण करणार आहे. तर दुसरीकडे गुरु व चंद्र हा मकर राशीत असल्यामुळे गजकेसरीसारखा राजयोग तयार झाला आहे.

बुध हा बुद्धिमत्ता, तर्क, यश इत्यादीचा काराक मानला जातो. या ग्रहाच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींवर कसा परिणाम होईल. बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे निर्माण झालेला शुभ योग आणि त्याचा प्रभाव यामुळे 6 राशींना खूप फायदा (Benefits) होईल. या राशीचे लोक श्रीमंत होतील आणि करिअर आणि व्यवसायात चांगली प्रगती करतील. चला जाणून घेऊया कोणत्या राशींवर बुध गोचराचा शुभ प्रभाव पडणार आहे.

1. वृषभ

तुम्हाला पैशांची (Money) बचत करण्यात यश मिळेल आणि नोकरीतही चांगल्या संधी मिळतील. जर तुम्हाला परदेशात नोकरी (Job) किंवा शिक्षण घ्यायचे असेल तर तुमची इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा असेल आणि कुटुंबाच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.

2. कर्क

वैवाहिक जीवनात चांगले सामंजस्य दिसून येईल आणि एकमेकांचा आदर कराल, ज्यामुळे नाते मजबूत होईल. व्यवसायाशी संबंधित लोक चांगली कामगिरी करतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि सन्मान देखील वाढेल. या काळात अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होणार आहे.

3. कन्या

नोकरीमध्ये नवीन आणि चांगल्या संधी मिळतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील आणि सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम राहील. नशिबाने साथ दिल्याने रखडलेली कामे पूर्ण होतील आणि सरकारी योजनांचाही चांगला फायदा होईल. या कालावधीत, मित्रांसोबत फिरण्यासाठी भरपूर पैसे खर्च होतील, परंतु तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत राहाल.

4. तुळ

या काळात व्यावसायिक आणि वैयक्तिक बाबींमध्ये चांगले लाभ होतील. व्यवसायात चांगली वाढ होईल आणि प्रगतीच्या संधीही उपलब्ध होतील. तूळ राशीचे राशीचे लोक या काळात प्रतिस्पर्ध्यांशी कडवी झुंज देऊ शकतील आणि नशिबाच्या पाठिंब्याने यशस्वीही होतील. जोडीदारासोबतचे नाते मजबूत राहील आणि कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

5. मकर

आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरदारांना पगार वाढण्याची चांगली शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी तुमचे संबंध दृढ होतील आणि तुम्हाला करिअरच्या क्षेत्रात चांगले फायदे मिळतील. कुटुंबासह चांगला वेळ घालवतील.

6. मीन

करिअरमध्ये चांगली प्रगती होईल आणि परदेशातूनही नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील. ज्यांना परदेशात राहायचे आहे, त्यांची इच्छा पूर्ण होईल. या काळात गुंतवणुकीत चांगला परतावा मिळेल आणि नफा मिळविण्याच्या चांगल्या संधी असतील.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! बायकोचे बॉयफ्रेंडशी प्रेमसंबंध उघड; संतापलेल्या नवऱ्याकडून पोलीस स्टेशनमध्येच पत्नीची गोळ्या झाडून हत्या

India Travel : जगातील ५ सर्वात स्वस्त टूरिस्ट प्लेसेस, आयुष्यात एकदा तरी या ठिकणाला भेट द्या

Maharashtra Live News Update : जळगावात शरद पवार गटाला धक्का! जिल्हाध्यक्षाचा तडकाफडकी राजीनामा

Adhik Maas 2026: हिंदू नववर्ष 2083 मध्ये 12 नव्हे तर असणार 13 महिने; जाणून घ्या यागामचं धार्मिक कारण

Makar Sankranti 2026: तब्बल १९ वर्षांनंतर होणार चमत्कार; 'या' ३ राशींचं नशीब संक्रांतीला उजळणार

SCROLL FOR NEXT